
Anurag Kashyap: कमल हसन नंतर आता अनुरागची The Keral Story वर टीका, म्हणाला.. एक निव्वळ राजकीय
Anurag Kashyap on The Kerala Story News: द केरळ स्टोरी सिनेमाबद्दल अनेक वादविवाद सुरु आहेत. सिनेमा आवडणारे आणि सिनेमावर टीका करणारे दोन गट निर्माण झाले आहेत. सुप्रसिद्ध अभिनेते कमल हसन यांनी द केरळ स्टोरी सिनेमावर टीका केली होती. आता अभिनेता - दिग्दर्शक अनुराग कश्यपने द केरळ स्टोरी सिनेमावर टीका केलीय. अनुराग कश्यपने द केरळ स्टोरी सिनेमाबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आहे.
(anurag kashyap on the kerala story film controversy called this is propoganda film)
एका न्यूज पोर्टलशी खास बातचीत करताना अनुराग कश्यप म्हणाले, 'आजच्या युगात राजकारणापासून कोणीही वाचलेले नाही. आजकाल सिनेमा बिगर-राजकीय असणे खूप अवघड आहे. द केरळ स्टोरी सारखे अनेक प्रोपगंडा चित्रपट बनवले जात आहेत. मी कोणत्याही गोष्टीवर बंदी घालण्याच्या विरोधात आहे पण हा चित्रपट खरोखरच प्रचारात्मक चित्रपट आहे या विधानावरवर मी ठाम आहे." असं मत अनुरागने व्यक्त केलंय.
अनुराग कश्यप पुढे म्हणाला की, तो एक फिल्ममेकर आहे. आणि यामुळे, कोणत्याही विचारधारेचा प्रचारक किंवा एका राजकीय कार्यकर्त्यासारखा वाटेल असा चित्रपट बनवायचा नाही. सत्य आणि वास्तवावर आधारित सिनेमा असला पाहिजे, असे अनुराग कश्यपने सांगितले.