निर्मात्याने अनुराग कश्यपला ग्लास फेकून मारला अन् सतीश कौशिक झाले 'तेरे नाम'चे डिरेक्टर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anurag Kashyap says he was fired as director from Tere Naam as he wanted Salman Khan to grow chest hair after that satish kaushik came as director

निर्मात्याने अनुराग कश्यपला ग्लास फेकून मारला अन् सतीश कौशिक झाले 'तेरे नाम'चे डिरेक्टर

सलमान खान आणि भूमिका चावला यांची प्रमुख भूमिका असलेला 'तेरे नाम' हा चित्रपट पहिला नसेल असं क्वचितच कुणी असेल. या चित्रपटाने केवळ बॉक्स ऑफिस वरच नाही तर तरुणांच्या मनावरही नुसता धुमाकूळ घातला होता. एक वेगळी प्रेम कहाणी या चित्रपटातून पाहायला मिळाली.

या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते सतीश कौशिक यांनी. कालच म्हणजे गुरुवार 9 मार्च रोजी अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते सतीश कौशिक यांचे निधन झाले. त्यांच्या आयुष्यातील एक महत्वाचा चित्रपट म्हणजे 'तेरे नाम'. या चित्रपटाचे त्यांनी इतके दमदार दिग्दर्शन केले की सलमानलाही मोठी प्रसिद्धी मिळाली. पण हा चित्रपट त्यांच्याकडे कसा आला याचाही एक मोठा किस्सा आहे..

सलमानचा 'तेरे नाम' चित्रपट आधी अनुराग कश्यप दिग्दर्शित करणार असे ठरले होते. त्यानुसार संहिता आणि इतर सर्व काही फायनल झाल्या. पण अनुराग कश्यपने मात्र एक अट घातली. उत्तर प्रदेशातील 'राधे' हे पात्र सलमान करणार होता, त्यामुळे त्याने छातीवरचे केस काढू नये, अशी अट त्याने घातली.

ही अट सलमानला काही मान्य होईना. मग शेवटी अनुरागने निर्मात्यापुढे ही अट मांडली. ही अट ऐकताच निर्माते संतापले. सलमानला छातीवर केस ठेव हे सांगणारा तु कोण म्हणून त्यांनी अनुराग कश्यपला ग्लास फेकून मारला. त्यानंतर त्याच्याकडून हा चित्रपट काढून घेण्यात आला.

(Anurag Kashyap says he was fired as director from Tere Naam as he wanted Salman Khan to grow chest hair after that satish kaushik came as director)

पुढे अनुराग आणि सलमान खान यांच्यामध्ये वाद झाला आणि 'तेरे नाम' चित्रपट सतीश कौशिक यांच्याकडे सोपवण्यात आला. त्यानंतर सतीश कौशिक यांनी जी जादू केली ती अवघ्या जगाने पहिली. तेरे नाम हीट नाही तर सुपर हीट झाला.

पण ही सल अनुरागच्या मनात मात्र कायमची राहिली. अनुरागने अनेक मुलाखतींमध्ये हा किस्सा आवर्जून सांगितला आहे. आज अनुराग कश्यप बॉलीवुडमधला एक दिग्गज दिग्दर्शक असून त्याच्या चित्रपटात काम करण्यासाठी स्टार्स वाट पाहत असतात.