अनुराग कश्यपची लेक Aaliyah Kashyap ने गुपचुप उरकला साखरपुडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aaliyah Kashyap engagement, Anurag Kashyap news, Aaliyah Kashyap engagement news

अनुराग कश्यपची लेक Aaliyah Kashyap ने गुपचुप उरकला साखरपुडा

Anurag Kashyap's daughter Aaliyah Kashyap secret engagement news: चित्रपट निर्माते अनुराग कश्यपची मुलगी आणि YouTuber असलेली आलिया कश्यप हिने बॉयफ्रेंड शेन ग्रेगोयरसोबत गुपचूप साखरपुडा केलाय.

आलियाने तिची प्रचंड हिऱ्याची अंगठी दाखवत दोन फोटो शेअर केले आहेत. याशिवाय आलियाने हिरव्या शेतात किसिंगचे फोटो शेयर केलेत. तिने याबाबत एक चिठ्ठीही लिहिली आहे.

(Anurag Kashyap's daughter Aaliyah Kashyap secretly engagement with boyfriend)

साखरपुड्याचे फोटो शेअर करताना आलियाने इंस्टाग्रामवर लिहिले, “Soooooo हे घडले !!!!! माझ्या जिवलग मित्राला, माझ्या जोडीदाराला, माझ्या सोबतीला आणि आता माझ्या FIANCÉ ला!

तू माझ्या आयुष्यातील प्रेम आहेस. खरे आणि बिनशर्त प्रेम कसे वाटते ते मला दाखवल्याबद्दल धन्यवाद.

तुला हो म्हणणे ही मी आतापर्यंत केलेली सर्वात सोपी गोष्ट होती आणि माझ्या प्रिय, तुझ्याबरोबर माझे उर्वरित आयुष्य घालवण्याची मी वाट करू शकत नाही. मी तुझ्यावर सदैव प्रेम करते आणि नेहमीच करत राहील.."

अनुराग कश्यपने लेकीच्या पोस्टवर तीन हार्ट इमोजीसह “अभिनंदन” अशी प्रतिक्रिया दिली. तिची जवळची मैत्रीण आणि अभिनेत्री जान्हवी कपूरनेही प्रतिक्रिया दिली.

अशाप्रकारे अनुरागच्या लेकीवर बॉलिवूडचे सितारे आणि तिचे फॅन्स साखरपुड्याबद्दल अभिनंदन करत आहेत. आलिया एक यूट्यूबर आहे आणि तिचे स्वतःचे खूप चाहते आहेत.

ती तिच्या चॅनलवर तिच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी शेअर करते. ती गेल्या काही वर्षांपासून शेनला डेट करत आहे. एका डेटिंग अॅपवर त्यांची भेट झाली होती.