अनुष्का बनणार परी 

वृत्तसंस्था
बुधवार, 3 मे 2017

अभिनेत्री अनुष्का शर्माने आतापर्यंत विविध भूमिका साकारीत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या "फिल्लौरी' चित्रपटातील तिच्या भूमिकेचे सगळीकडे खूप कौतुक झाले.

त्यात तिने भुताची भूमिका साकारली होती. आता प्रेक्षकांना ती आणखीन एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. भूत साकारल्यानंतर ती परीच्या भूमिकेत दिसेल. निर्माती अनुष्का शर्माने तिच्या "क्‍लीन स्लेट' या बॅनरअंतर्गत नुकतीच तिसऱ्या चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटाचे नाव "परी' असून, यात ती परीची भूमिका साकारणार आहे. यात अनुष्का बंगाली अभिनेता परमब्रत चॅटर्जीसोबत झळकणार आहे.

यापूर्वी परमब्रतने 2012 मध्ये आलेल्या "कहानी' चित्रपटात विद्या बालनसोबत काम केले आहे. याबाबत परमब्रत म्हणाला की, "मी "परी' चित्रपटात व अनुष्कासोबत काम करण्यासाठी खूपच उत्सुक आहे.' अनुष्काच्या या चित्रपटाची निर्मिती अर्जुन एन. कपूर यांच्या क्रिअर्ज एण्टरटेन्मेंट बॅनरसोबत करणार आहे. "परी'ची पटकथा खूप चांगली आहे आणि दिग्दर्शक प्रोसित रॉय यांच्या कामावर पूर्ण विश्‍वास असल्याचे तिने सांगितले. अनुष्का सध्या आगामी चित्रपट "द रिंग'मध्ये व्यस्त असल्यामुळे "परी'च्या चित्रीकरणाला जूनमध्ये सुरुवात होणार आहे.  

Web Title: Anushka Sharma announces her next project Pari with Bengali star Parambrata Chatterjee