अनुष्काची तीन रूपं.. 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

काही दिवसांपूर्वी अनुष्का शर्माचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यामध्ये ती एका म्हाताऱ्या बाईसारखा मेकअप केलेली दिसत होती. तो मेकअप "झीरो' चित्रपटासाठी नसून तो एका नामांकित बॅंकेच्या जाहिरातीसाठीच होता.

या जाहिरातीसाठी अनुष्का शर्मा मुलगी, आई आणि आजी अशा तीन भूमिकांमध्ये दिसणार आहे. या तीन पिढ्यांच्या भूमिकेबद्दल बोलताना अनुष्का म्हणते, "मी यापूर्वी अशा प्रकारच्या तीन भूमिका एकाच जाहिरात किंवा चित्रपटात केलेल्या नाहीत. त्यामुळे ही जाहिरात करण्यासाठी मी खूपच उत्साही होते. मी माझ्या करियरच्या सुरुवातीपासूनच वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करण्याचा प्रयोग करत आले आहे. मी यावर्षीही अशाच विविध प्रकारच्या भूमिका असलेले चित्रपट करणार आहे.' अनुष्काच्या या चित्रपटांमध्ये "झीरो' आणि "संजू' हे दोन चित्रपट सामील आहेत. 

Web Title: anushka sharma have 3 looks in one advertisement