'पोल्का प्रिंट ड्रेस आणि प्रेग्नंसी कनेक्शन', अनुष्का शर्माच्या ड्रेसवरुन मजेदार मीम्स व्हायरल

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Saturday, 29 August 2020

अनुष्काने घातलेल्या काळ्या रंगाच्या पोल्का प्रिंट ड्रेसवरुन अनेक मीम्स व्हायरल होत आहेत जे पाहून तुम्हाला तुमचं हसू आवरता येणार नाही.

मुंबई- अनुष्का शर्मा आणि विराट कोहली या कपलने नुकतीच त्यांच्या घरी लहान पाहुणा येणार असल्याची घोषणा केली होती. यावेळी त्यांनी जो फोटो शेअर करत ही गोड बातमी दिली तो फोटो सध्या खूप चर्चेत आहे. या फोटोमध्ये अनुष्काने घातलेल्या काळ्या रंगाच्या पोल्का प्रिंट ड्रेसवरुन अनेक मीम्स व्हायरल होत आहेत जे पाहून तुम्हाला तुमचं हसू आवरता येणार नाही.

हे ही वाचा: सुशांतची बहीण श्वेताने लीक केले ड्रग ग्रुप चॅट्स, पिठानीने लिहिलंय, 'SSR को डुबी मिल गई ना?'  

अनुष्का शर्माने तिचे बेबी बंप दाखवत फोटो शेअर केला होता आणि लवकरंच दोघं आई बाबा बनणार असल्याचं सांगितलं होतं. ही बातमी ऐकून त्यांचे चाहते खूपंच खुश झाले तर दुसरीकडे तिच्या ड्रेसवरुन अनेक मीम्स बनायला लागले. प्रियांका चोप्रा पासून ते नताशा स्टानकोविक यांच्या पोल्का प्रिंट ड्रेसवरुन तेही या मीम्समध्ये झळकायला लागले.

अनुष्का शर्मा-विराट कोहली

काही महिन्यांपूर्वी जेव्हा हार्दिक पांड्या आणि नताशाने गोड बातमी देत फोटो शेअर केला होता त्यावेळी नताशा देखील काळ्या रंगाच्या पोल्का प्रिंट ड्रेस मध्ये दिसून आली होती. ज्यामुळे आता 'हा ड्रेस आणि प्रेग्नंसी कनेक्शन'चे मजेदार मीम्स व्हायरल होत आहेत. नताशा आणि अनुष्कानंतर प्रियांका चोप्राचा पोल्का प्रिंट ड्रेस घातलेला फोटो आता व्हायरल होत आहे. यात तीघींचे सेम ड्रेसमधील फोटो शेअर करत म्हटलंय, 'नताशा, अनुष्कानंतर प्रियांकासाठी हा ड्रेस लकी ठरणार का?' इतकंच नाही तर करिना कपूर, रणवीर सिंह यांचे फोटो देखील इंटरनेटवर सध्या धुमाकुळ घालत आहेत.

 

Anushka Sharma's Pregnancy Revealed Black And White Dress Invites Trolls  And Memes | Do pregnant actresses have formal attire? The trolls ask when  they see Anushka's picture | MbS News

त्यांचं म्हणणं आहे ज्यांनी हा ड्रेस घातला आहे ते लवकरचं गोड बातमी देऊ शकतात म्हणून आणखी एका मीम्समध्ये म्हटलं गेलंय की, 'कमिंग सून, नताशा आणि अनुष्कानंतर आता प्रियांका देखील गोड बातमी देऊ शकते कारण तिनेही हा पोल्का प्रिंट ड्रेस घातला आहे.' या मीम्सवरील कॅप्शन पाहून तुम्ही देखील हैराण व्हाल आणि लोकांच्या क्रिएटीव्हीटीला दाद द्याल.

Anushka's Polka Pregnancy Reveal Outfit Triggers Funny Memes; Netizens Call  It 'Chamatkari Dress' | Laughing Colours

एकाने लिहिलंय 'जादूचा ड्रेस', तर दुस-याने म्हटलंय 'या ड्रेसमध्ये नक्कीच काहीतरी गडबड आहे. दोघीही प्रेग्नंट झाल्या.' तर एकाने म्हटलंय, 'जुनी शाळा- मुलीला विचारा की तिला मुल पाहिजे का? नवीन शाळा- मुलीला विचारा तिला हा ड्रेस घालायचा आहे का?' यासारखे अनेक मीम्स पाहून तुम्ही देखील लोटपोट व्हाल.   

anushka sharma polka dots dress hilarious memes natasa priyanka  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: anushka sharma polka dots dress hilarious memes natasa priyanka