गर्भवती महिलांसाठी अनुष्काने शेअर केली महत्वाची माहिती

कोरोना काळात अनेक कलाकारांकडून गरजूंची विविध प्रकारे मदत
Anushka Sharma
Anushka Sharma

कोरोना काळात अनेक कलाकारांनी गरजूंची विविध प्रकारे मदत केली. बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा Anushka Sharma आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली Virat Kohli या जोडीनेदेखील कोरोना रूग्णांसाठी तसेच गरजूंसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. नुकतेच अनुष्काने कोरोना काळ आणि गर्भवती महिला याविषयी माहिती देणारी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. (anushka sharma shares valuable information for expectant mothers in pandemic)

अनुष्काने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली यामध्ये तिने लिहिले, 'ncwindia या संस्थेने हॅपी टू हेल्प या उपक्रमाअंतर्गत 24 तास कार्यरत असणारा 9354954224 हा हेल्पलाईन नंबर लाँच केला आहे. या नंबर वरून ते गर्भवती महिलांना वैद्यकिय मदत करणार आहेत. या संस्थेची टिम कोणत्याही वेळी गर्भवती महिलांच्या मदतीसाठी उपलब्ध आहे.' कोरोना काळात गर्भवती महिलांना सुविधा वेळेवर मिळत नसल्याने त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे अशा महिलांच्या मदतीसाठी अनुष्काने हा मेसेज शेअर केला आहे.

Anushka Sharma
'मला पैसे मागायला लाज वाटते'; फंड जमा करण्याबाबत बिग बींचं वक्तव्य

जानेवारी महिन्यात अनुष्काने वामिकाला जन्म दिला. अनुष्का गरोदरपणी स्वत:ची विशेष काळजी घेत होती. कोरोना काळात अनुष्का आणि विराटने गरजूंसाठी मोठी मदत केली आहे. विरूष्काने कोरोना काळात एक मोहिम सुरू केली. या मोहिमेअंतर्गत दोघांनी 11 कोटी इतकी रक्कम जमा केलीये. या जोडीने 2 कोटी रुपये जमा करत या मोहिमेला सुरुवात केली होती. सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करून विरूष्काने लोकांना त्यांच्या या मोहिमेमध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com