अनुष्का शर्माने सुनील गावस्करांच्या 'त्या' कमेंटला दिलं सडेतोड उत्तर

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Friday, 25 September 2020

मॅचमध्ये कॉमेंट्री करताना सुनील गावस्कर यांनी विराट कोहली आणि पत्नी अनुष्का शर्मा यांच्यावर वैयक्तिक टिप्पणी केली. त्यांनी कॉमेंट्री करताना म्हटलं की, 'यांनी लॉकडाऊनमध्ये फक्त अनुष्काच्या बॉलिंगची प्रॅक्टीस केली आहे.'

मुंबई-  दुबईत आयपीएल १३ सुरु आहे. नुकतीच गुरुवारी विराट कोहलीच्या कॅप्टनशिपमध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि केएल राहूलची टीम किंग्स एलेवन पंजाब यांच्यामध्ये मॅच रंगली. मात्र या मॅच दरम्यान विराट कोहलीचा परफॉर्मन्स काही खास झाला नाही. अशातंच मॅचमध्ये कॉमेंट्री करताना सुनील गावस्कर यांनी विराट कोहली आणि पत्नी अनुष्का शर्मा यांच्यावर वैयक्तिक टिप्पणी केली. त्यांनी कॉमेंट्री करताना म्हटलं की, 'यांनी लॉकडाऊनमध्ये फक्त अनुष्काच्या बॉलिंगची प्रॅक्टीस केली आहे.'

हे ही वाचा: विराट कोहलीने सोडली कॅच आणि ट्रोल झाली अनुष्का शर्मा, लोकांच्या क्रिएटीव्हीला आला ऊत  

सुनील गावस्कर यांची ही कमेंट विराटच्या चाहत्यांना अजिबात आवडली नाही आणि त्यांना ट्रोल केलं जाऊ लागलं. हे असं पहिल्यांदाच घडत नाहीये की जेव्हा विराट खराब खेळला असेल आणि अनुष्का ट्रोल झाली असेल. याआधी अनेकदा विराटच्या खराब खेळीसाठी अनुष्काला जबाबदार धरत ट्रोल करण्यात आलं आहे. आता विराटची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्माने देखील सुनील गावस्कर यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. 

अनुष्का शर्माने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलंय, 'मिस्टर गावस्कर, तुमची ही कमेंट अजिबात आवडली नाही. मी तुम्हाला उत्तर देऊ इच्छिते. तुम्ही माझ्या पतीसोबत कटाक्षाने माझं नावही घेतलंय. मला हे माहित आहे की तुम्ही कित्येक वर्षांपासून क्रिकेटर्सच्या वैयक्तिक आयुष्याचा आदर करत आला आहात. तुम्हाला नाही वाटत का की आम्हीपण यासाठी पात्र आहोत.' अनुष्का शर्माची ही प्रतिक्रिया आता व्हायरल होत आहे.

अनुष्काने पुढे लिहिलंय, 'तुम्ही वेगळ्या शब्दात देखील माझ्या पतीवर निशाणा साधू शकत होतात. मात्र तुम्ही माझ्या नाव यात ओढून आणलं हे योग्य आहे का? हे २०२० पासून सुरु आहे मात्र माझ्यासाठी आजही या गोष्टी माझ्याकडून दुर्लक्षित झालेल्या नाहीत. मला नेहमी क्रिकेटमध्ये ओढलं जातं. मी तुमचा खुप आदर करते. तुम्ही या खेळात महान आहात. मी तुम्हाला केवळ एवढंच सांगू इच्छिते की तुम्ही हे समजू शकता जेव्हा यात माझं नाव ओढलं गेलं असेल तेव्हा मला कसं वाटलं असेल?' 

Distasteful': Anushka Sharma snaps at Sunil Gavaskar for 'sexist remark' at  husband Virat Kohli's IPL game

विराट आणि अनुष्काने काही दिवसांपूर्वीच दोघं पालक होणार असल्याची गुडन्युज दिली आहे. जानेवारी २०२१ मध्ये त्यांच्या घरी चिमुकल्या पावलांंच आगमन होणार असल्याचं त्यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून सांगितलं होतं. या ट्रोलिंगमध्ये केवळ विराट-अनुष्काचं नाही तर त्यांच्या प्रेग्नंसीवरुनही त्यांना ट्रोल केलं गेलंय. काहींचं म्हणणं आहे की विराट-अनुष्का लॉकडाऊनमध्ये घराच्या खाली क्रिकेट खेळत होते त्यावर ही कमेंट केली आहे तर काहींनी याचा दुहेरी अर्थ काढत अनुष्काच्या प्रेग्नंसीवर कमेंट केल्याचं म्हटलंय.   

anushka sharma slam sunil gavaskar for his controversial comment on virat kohli performance  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: anushka sharma slam sunil gavaskar for his controversial comment on virat kohli performance