अखेर अनुष्कानं प्रेग्नंसीवर सोडलं मौन म्हणाली...

वृत्तसंस्था
मंगळवार, 30 जुलै 2019

काही दिवसांपासून अभिनेत्री अनुष्का शर्मा प्रेग्नंट असल्याच्या चर्चा जोरदार सुरू आहेत. खरं तर ही पहिली वेळ नाही की बॉलिवूडच्या एखाद्या अभिनेत्रीच्या प्रेग्नंसीच्या चर्चा सुरु आहे. लग्नानंतर प्रत्येक अभिनेत्रीच्या बाबतीत असं घडत असतं. सध्या अभिनेत्री प्रियांका चोप्रासोबतही असंच घडलेले आपण पाहिले असेल. त्यानंतर आता अनुष्काच्या बाबतीतही तेच चालू आहे.

मुंबई : काही दिवसांपासून अभिनेत्री अनुष्का शर्मा प्रेग्नंट असल्याच्या चर्चा जोरदार सुरू आहेत. खरं तर ही पहिली वेळ नाही की बॉलिवूडच्या एखाद्या अभिनेत्रीच्या प्रेग्नंसीच्या चर्चा सुरु आहे. लग्नानंतर प्रत्येक अभिनेत्रीच्या बाबतीत असं घडत असतं. सध्या अभिनेत्री प्रियांका चोप्रासोबतही असंच घडलेले आपण पाहिले असेल. त्यानंतर आता अनुष्काच्या बाबतीतही तेच चालू आहे.
 
प्रेग्नंसीच्या मुद्द्यावर बोलताना अनुष्का म्हणाली आहे की, 'लोकांनी आम्हाला कमीत कमी एवढी तरी सूट द्यावी की आम्ही आमच्या आयुष्यात शांतपणे जगू शकू. एक अभिनेत्री लग्न करते आणि तिला त्यानंतर पुढे एकच प्रश्न विचारला जातो. तो प्रेग्नंसीशी जोडलेला असतो. जेव्हा आम्ही डेट करत असतो त्यावेळी लग्न कधी करणार हा प्रश्न असतो. तुम्ही लोकांना त्यांचं आयुष्य जगायला द्यायला हवं. कारण अशा लोकांमुळे काही अशी परिस्थिती निर्माण होते की, आम्हाला जबरदस्तीनं त्याचं स्पष्टीकरण द्यावं लागतं. मला ही गोष्ट खूप खराब वाटते. मला याहून जास्त काही स्पष्टीकरण देणं गरजेच वाटत नाही.'

दरम्यान, अनुष्काच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर, ती शेवटची शाहरुख खानच्या झीरो सिनेमात दिसली होती. या सिनेमात अनुष्काच्या अभिनेयाचं कौतुक मात्र झालं. या सिनेमात तिनं डिफ्रेंटली एबल्ड नासा सायंटिस्टची भूमिका साकारली होती. याशिवाय तिच्या पर्सनल लाइफ बद्दल बोलायचं तर काही दिवस पती विराट कोहलीसोबत यूकेमध्ये होती. सेमीफायनलमध्ये भारतीय संघाला हार पत्कारावी लागल्यानंतर विराट आणि अनुष्कानं काही दिवस युकेमध्ये घालवले. यावेळचे त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: anushka sharma slams on pregnancy rumours