अनुष्का वापरते विराटचे कपडे कारण...

वृत्तसंस्था
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

अनुष्का शर्मा तिच्या 'वोग' मासिकाच्या सुपरहॉट फोटोशुटमुळे चर्चेत होती. वोग मासिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने आपल्या खाजगी आयुष्यातील काही गोष्टींचा खुलासा केला. 

मुंबई : बॉलिवूडमधील कपल्स कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. बॉलिवूडच्या फेवरेट कपल्सपैकी एक आहे विराट आणि अनुष्का ! त्यांचं एकमेकांवर किती प्रेम आहे हे त्यांच्या इन्स्टाग्रामवरील फोटोंवरुन समजून येतेच. या कपलने एकत्र फोटो अपलोड केला की तो इंटरनेटवर व्हायरल होतोच. अनुष्का शर्मा तिच्या 'वोग' मासिकाच्या सुपरहॉट फोटोशुटमुळे चर्चेत होती. वोग मासिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने आपल्या खाजगी आयुष्यातील काही गोष्टींचा खुलासा केला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

@vogueindia

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

अनुष्काने या मुलाखतीमध्ये तिच्या आणि विराटच्या नात्याविषयी तसेच आणि काही मजेशीर गोष्टींविषयी मोकळेपणाने चर्चा केली. यावेळी तिने सांगितलं की, ती अनेकदा पती विराटचे कपडे घालते. अनुष्का म्हणाली,' मी विराटच्या वॉडरोबमधून अनेकदा त्याचे कपडे घेते. खासकरुन शर्ट किंवा टी-शर्ट घेणं मला आवडतं. तर कधी त्याचे जॅकेटस् घालणं मला खूप आवडतं. मला त्याचे कपडे घातल्यावर आनंद होतो.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

@vogueindia

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

वोगसाठी केलेल्या शुटचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती हॉट आणि क्लासी दिसत आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या करवाचौथच्या दिवसाचे खास फोटो या कपलने इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. त्यानंतर भूटानला फिरायला गेलेल्या या कपलने ट्रेकचा आनंद घेतला. अनुष्का आणि विराटच्या भूटानमधील वेकेशन फोटोंनी चाहत्यांना वेड लावलं. त्यांचे ट्रेक करतानाचे काही सुंदर फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले. 

विराट आणि अनुष्का यांनी काही काळ डेट केल्यावर डिसेंबर 2017 मध्ये लग्न केलं. शाहरुखसोबत अनुष्काने 2018 मध्ये 'झिरो' हा चित्रपट केला. त्य़ानंतर ती कोणत्या चित्रपटात दिसली नाही. असं असलं तरी मात्र सोशल मीडियावर ती सतत अॅक्टीव असते. तिच्या आगामी रोमॅंटिंक सिनेमाच्या घोषणेची सर्वच वाट पाहत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anushka Sharma steals virat clothes because