जॅकलिनची छोटीशी भूमिका? 

वृत्तसंस्था
गुरुवार, 4 मे 2017

सध्या जोरदार चर्चा सुरू आहे ती एकता कपूर आणि मोहित सुरी यांच्या हाफ गर्लफ्रेंड या चित्रपटाची. नुकतीच या चित्रपटाची काही गाणी प्रदर्शित झाली.

त्यामध्ये अर्जुन कपूर आणि श्रद्धा कपूर आपापल्या स्टनिंग लूक्‍समध्ये दिसत आहेत. पण, या दोघांव्यतिरिक्त या चित्रपटात आणखी एक हिरोईन आहे. तुम्हालाही आश्‍चर्य वाटलं ना? इतके दिवस फक्त श्रद्धा आणि अर्जुनच या चित्रपटात आहेत हे माहीत होतं. पण, या चित्रपटात आणखी एक अभिनेत्री आहे ती म्हणजे जॅकलिन फर्नांडिस.

जॅकलिनचा यात फक्त कॅमिओ रोलच आहे; पण तो रोल काय असणार याची अद्याप कोणालाही कल्पना नाहीय. इतके दिवस या चित्रपटाच्या प्रमोशनपासून जॅकलिन लांबच होती; पण आता नक्की तिची ही छोटीशी भूमिका काय असणार याबद्दल लवकरच कळेल. 

Web Title: Apart from Arjun Kapoor and Shraddha Kapoor here’s who else will be seen in Half Girlfriend?