
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी त्यांच्या ट्विटरवरुन 'अपने' सिनेमाच्या सिक्वेलची अधिकृत घोषणा केली. २००७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'अपने' या सिनेमात धर्मेंद्र आणि त्यांची दोन्ही मुलं सनी देओल आणि बॉबी देओल यांनी मुख्य भूमिका साकारली होती.
मुंबई- बॉलीवूडमध्ये हिट आणि चर्चेत असलेल्या सिनेमांचा सिक्वेल बनणं काही नवीन नाही. 'धूम', 'दबंग', 'टायगर' अशा अनेक सिनेमांचे आत्तापर्यंत सिक्वेल आले आणि ते प्रेक्षकांना आवडले देखील. यानंतर आता अशाच एक सिनेमाच्या सिक्वेलची चर्चा आहे आणि हा सिनेमा म्हणजे 'अपने'. बॉलीवूडचे हिमॅन धर्मेंद्र यांनी 'अपने' या सिनेमाच्या सिक्वेलची घोषणा केली आहे.
हे ही वाचा: जेव्हा शाहरुख खानने मुकेश अंबानींच्या मुलाला विचारली होती पहिली सॅलरी...
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी त्यांच्या ट्विटरवरुन 'अपने' सिनेमाच्या सिक्वेलची अधिकृत घोषणा केली. २००७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'अपने' या सिनेमात धर्मेंद्र आणि त्यांची दोन्ही मुलं सनी देओल आणि बॉबी देओल यांनी मुख्य भूमिका साकारली होती. 'गदरः एक प्रेम कथा'चे दिग्दर्शक अनिल शर्मा यांना या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. 'अपने' सिनेमात धर्मेंद्र यांनी हताश माजी बॉक्सरची भूमिका साकारली होती जो त्याच्या मुलांच्या माध्यमातून त्याच्या करिअरमध्ये गमावलेला सन्मान मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो.
अभिनेते धर्मेंद्र यांनी जुन्या सिनेमाची एक व्हिडिओ क्लीप त्यांच्या ट्विटरवर शेअर केली आहे आणि लिहिलंय, 'देवाच्या आशिर्वादाने, तुमच्या प्रार्थनेने आम्ही तुमच्यासाठी अपने-२ बनवण्याचा निर्णय घेतला आहे.' हा सिनेमा पुढच्या वर्षी रिलीज होणार असल्याचं म्हटलं जातंय.
With his blessings your good wishes, we have decided to give you APNE pic.twitter.com/e7JdnkHtSM
— Dharmendra Deol (@aapkadharam) November 29, 2020
या सिनेमाला शुभेच्छा देणा-यांना धर्मेंद्र यांनी म्हटलंय, ''शुभेच्छांसाठी तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद. हा सिनेमा आधुनिक युगावर आधारित असेल.'' अपने सिनेमात धर्मेंद्र आणि देओल बंधुंसोबत कतरिना कैफ, शिल्पा शेट्टी आणि किरण खेर झळकले होते.
apne film to be made sequel bollywood heman dharmendra announced