महिलेशी सलगी साधण्यास केलेल्या चॅटवर चेतन भगत यांचा फेसबुकवरुन माफीनामा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 ऑक्टोबर 2018

एका महिलेने लेखक चेतन भगत यांच्यावर 'आपल्याशी व्हॉट्स अॅपवर संभाषण करुन सलगी साधण्याचा प्रयत्न केला.' असा आरोप केला आहे.

प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांच्यावर आपल्याशी फ्लर्ट केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. चेतन यांच्याशी झालेली व्हॉट्स अॅप संभाषण या महिलेने व्हायरल केली आहे. यावर चेतन यांनी या महिलेची आणि आपली पत्नी अनुषाचीही माफी मागितली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या गैरवर्तनाच्या आरोपांनंतर #MeToo मोहिमेद्वारे अनेक महिलांनी आपल्यासोबत घडलेल्या घटना कथन केल्या आहेत. दरम्यान एका महिलेने लेखक चेतन भगत यांच्यावर 'आपल्याशी संभाषण करुन सलगी साधण्याचा प्रयत्न केला.' असा आरोप केला आहे. या दोघांमध्ये झालेल्या व्हॉट्सअॅपवरील चॅटींगचे स्क्रीनशॉट्स महिलेने सोशल मीडियावर पोस्ट केले. चेतन भगत यांनी ही संभाषण आपणच केल्याचे कबूल करत ही महिला आणि आपल्या पत्नीची माफी मागितली आहे. चेतन यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे संबंधित महिलेची माफी मागत आपली चूक मान्य केली आहे. 

chetan bhagat

या संभाषणामध्ये चेतन भगत त्या महिलेशी प्रेमाची भाषा करताना दिसत आहे. तसेच असे संभाषण झाल्याचे त्यांनी मान्यही केले आहे. मात्र हे संभाषण अनेक वर्षांपूर्वीचे असल्याचा दावा त्यांनी केला आहे. 

आपल्याला संबंधित महिला खूपच छान, चांगली आणि खूपच वेगळी महिला वाटत होती. आपले लग्न झालेले असतानाही आपण अशा भावनांसह एखादे नातेसंबंध प्रस्थापित करु शकत नाही. मात्र तरीही या महिलेशी माझ्या भावना जुळत असल्याचे मला वाटत होते. बऱ्याच वर्षात संबंधित महिलेशी आपला संपर्कही झालेला नाही. तिचा नंबरही आपण डिलीट केला होता, असेही त्यांनी आपला बचाव करताना आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: An apology from Chetan Bhagat on Facebook for chatting with the woman in a wrong manner