esakal | सुशांत सिंहवर चित्रपट काढण्यासाठी 'इम्पा'कडे आले नावनोंदणीसाठी अर्ज
sakal

बोलून बातमी शोधा

सुशांत सिंहवर चित्रपट काढण्यासाठी 'इम्पा'कडे आले नावनोंदणीसाठी अर्ज

हिंदी चित्रपटसृष्टीतील काही प्राॅडक्शन हाऊसनी सुशांतच्या जिवनावर चित्रपट काढण्यासाठी इम्पाकडे (इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर्स असोसिएशन) चित्रपटाची नावनोंदणी करण्यासाठी अर्ज केले आहेत

सुशांत सिंहवर चित्रपट काढण्यासाठी 'इम्पा'कडे आले नावनोंदणीसाठी अर्ज

sakal_logo
By
संतोष भिंगार्डे


मुंबई ः बाॅलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला आता दोन महिने उलटून गेले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविला आहे आणि सीबीआयची टीम या प्रकरणाचा तपास करीत आहे. आता हिंदी चित्रपटसृष्टीतील काही प्राॅडक्शन हाऊसनी सुशांतच्या जिवनावर चित्रपट काढण्यासाठी इम्पाकडे (इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर्स असोसिएशन) चित्रपटाची नावनोंदणी करण्यासाठी अर्ज केले आहेत.

दिशा सालियन मृत्यु प्रकरणात खळबळजनक खुलासा, मृत्युनंतरही फोन १० दिवस होता ऍक्टीव्ह

सुशांतची आत्महत्या ही सगळ्यांना चटका लावणारी घटना होती. त्याने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली याचा तपास पोलिस करतीलच परंतु त्याची आत्महत्या झाल्यानंतर विविध चर्चांना उधाण आले होते. हिंदी चित्रपटसृष्टीतील काही कलाकारांनी नेपोटिझमचा मुद्दा उपस्थित केला होता. प्रत्येक दिवशी नवनवीन मुद्दे चर्चिले गेले आणि नवीन माहिती येत गेली. आता एकूणच सुशांतच्या जीवनावर चित्रपट काढण्यासाठी इम्पामध्ये तीन प्राॅडक्शन हाऊसनी चित्रपट काढण्याचे ठरविले आहे आणि चित्रपटाचे नाव रजिस्टर्ड करण्यासाठी अर्ज केले आहेत.

पीएसजे मीडियाने सुशांत सिंग राजपूत-द बायोग्राफी, तनोज मिश्राने सुशांत, एमएनएन फिल्म मीडियाने राजपूत-द ट्रुथ वीन्स या नावांसाठी अर्ज केला आहे. तसेच याच सुशांत सिंहवर काहींनी वेबसीरिज काढण्याचे ठरविले असल्याचे समजते.  शिवाय अन्य काही प्राॅडक्शन हाऊसदेखील या संपूर्ण विषयावर चित्रपट काढण्याचा विचार करीत असल्याचे समजते.

IMA च्या तब्बल 264 डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू; राज्यातील धक्कादायक आकडेवारीही आली समोर

याबाबत इम्पाचे सचिव अनिल नागरथ म्हणाले, की आमच्याकडे  शीर्षक नोंदविण्यासठी तशा प्रकारचे अर्ज आले आहेत. परंतु सुशांतच्या कुटुंबीयांकडून त्यांनी ना हरकत प्रमाणपत्र घेऊन येणे आवश्यक आहे. ते आणल्यानंतरच आम्ही नावनोंदणी करणार आहोत.

-----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे ).

loading image