दुसरी पत्नी हेलेनला यांची ओळख करुन देताना सलमान-अरबाजला सलीम यांनी काय दिलं उत्तर?| Salim Khan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arbaaz Khan Bollywood Actor reveals Salim Khan

Salim Khan : दुसरी पत्नी हेलेनला यांची ओळख करुन देताना सलमान-अरबाजला सलीम यांनी काय दिलं उत्तर?

Arbaaz Khan bollywood Actor reveals Salim Khan : टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये बॉलीवूडचा भाईजान सलमान खान आणि त्याचे कुटूंब हे नेहमीच वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका मुलाखतीमुळे खान कुटूंबीय हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. त्यामध्ये त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित केलेला खुलासा हा चाहत्यांसाठी चर्चेचा विषय ठरताना दिसतो आहे.

खरं तर अरबाज खानच्या व्हायरल झालेल्या त्या मुलाखतीमध्ये त्यांनी आपले कुटूंब आणि त्याच्याशी संबंधित काही धक्कादायक गोष्टी सांगितल्या आहेत. अरबाज खान हा बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आहे. तो निर्माताही आहे. त्यानं दिग्दर्शनात देखील चांगली कामगिरी केली आहे. अरबाजनं जेव्हा भाऊ सलमान खानसाठी चित्रपट केले त्यातून त्याला मोठी लोकप्रियता मिळाल्याचे दिसून आले आहे.

Also Read - Premium VideoMumbai Crime Story : लालबागच्या चाळीत रिंपल जैनने वीणा जैनचे तुकडे का केले?

सोशल मीडियावर अरबाज खानची एक मुलाखत व्हायरल झाली आहे. ई टाईम्सनं घेतलेल्या या मुलाखतीमध्ये अऱबाजनं वडील सलीम खान जेव्हा दुसऱ्या पत्नीला हेलन यांना घरी घेऊन आले तेव्हा त्यांनी आम्हा मुलांना ज्या गोष्टी सांगितल्या त्याविषयी अरबाजनं खुलासा केला आहे. चाहत्यांमध्ये त्यावरुन चर्चेला सुरुवात झाली आहे. ७० ते ८० च्या दशकांत सलीम खान हे बॉलीवूडचे प्रसिद्ध स्क्रिप्टरायटर म्हणून लोकप्रिय होते.

सलीम खान यांनी अरबाज यांची आई सुशीला उर्फ सलमा खान यांच्याशी १९६४ मध्ये विवाहबद्ध झाले होते. यानंतर १९८० मध्ये सलीम खान यांनी हेलनसोबत दुसरं लग्न केलं. अरबाजनं यावेळी सांगितलं की, जेव्हा वडील सलीम खान यांनी आमची ओळख हेलन यांच्याशी करुन दिली तेव्हा सांगितलं की, त्यांनी हेलन यांना देखील आई हाक मारावी आणि त्यांचा सन्मान करावा. त्यांचा आदर राखावा.

आम्ही खूप वर्षांपासून हेलन यांच्या जवळ आहोत. त्यांना आम्ही सगळे मावशी अशीच हाक मारतो. आमचं नातचं असं आहे. त्या आमच्या आई आहेत. त्या आमच्या आयुष्याचा मोठा भाग आहेत. वडील सलीम खान यांचे नाते जेव्हा सुरु झाले होते तेव्हा आम्ही खूप लहान होतो. त्यामुळे आमच्या कुटूंबियांमध्ये जे वाद झाले होते त्यापासून आम्हाला लांब ठेवण्यात आले होते. असेही अरबाजनं या मुलाखतीच्या दरम्यान सांगितले होते.