Archana Gautam: 'त्यांनी फक्त त्याचा वापर केलाय', अब्दू अन् एमसी स्टॅनच्या भांडणावर अर्चना गौतमनं ओतलं तेल..

Archana Gautam Pokes Fun At Abdu Rozik & MC Stan’s Massive  Fight
Archana Gautam Pokes Fun At Abdu Rozik & MC Stan’s Massive FightEsakal

'बिग बॉस 16' चे सर्वच सदस्य कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. त्यातच सध्या अब्दु रोजिक आणि सिझनचा विजेता एम सी स्टॅन हे दोघं त्याच्यातील वादामुळे चर्चेत आहेत. नुकतच दोघामध्ये वाद सुरु असून ते एकमेंकाशी बोलत नसल्याचं अब्दुनं पत्रकारांना सांगितलं होतं.

त्यानंतर दोघं आणि त्यांची मंडली बरीच चर्चेत आली. त्यानंतर शिव ठाकरेने तसं काही झालं नसून दोघांमध्ये काहीतरी गैरसमज झाला असून मी जिवंत असे पर्यंत मंडली तुटणार नाही असं सांगितलं.

Archana Gautam Pokes Fun At Abdu Rozik & MC Stan’s Massive  Fight
Pooja Bhatt: किरण खेरनंतर 'या' भट्ट अभिनेत्रीलाही कोरोनाची लागण!

सोशल मीडियावर दोघांच्या वादावर अनेक लोक आपली प्रतिक्रिया देताना दिसत आहे. दरम्यान, शोमध्ये आपल्या दमदार खेळासाठी प्रसिद्ध असलेल्या अर्चना गौतमनेही त्यांच्या भांडणावर भाष्य केलं आहे.

अर्चना गौतम विमानतळावर स्पॉट झाली होती. ती काळ्या रंगाचा ड्रेस परिधान करून स्टायलिश लूकमध्ये दिसली. यादरम्यान अर्चनाने पापाराझींनी घेरलं होतं.

दुसरीकडे, जेव्हा पापाराझीने तिला एमसी स्टॅन आणि अब्दूच्या भांडणावर प्रश्न विचारले तेव्हा ती म्हणाली की, "भाऊ, जेव्हा तुम्ही दुधात लिंबू घालाल तेव्हा दही होईल....त्यापेक्षा तर आमची चांगली मैत्री होती... जी तशीच राहील. आणि भविष्यात देखील. ”

Archana Gautam Pokes Fun At Abdu Rozik & MC Stan’s Massive  Fight
Dil Hai Bholaa Song Out: 'आज फिर जिने की...'अजयच्या 'अॅक्शनचा रोमान्स'! भोलामधील 'हे' गाणं भलतचं कडक

ती पुढे म्हणाते की, “मला असं वाटतं की घरातील सर्वांनी अब्दुचा फायदा घेतला होता. हे त्याला माहीत आहे की नाही हे माहीत नाही, पण मलाही तसच वाटतं.. कारण मी त्याच्यासोबत आत राहिली आहे. तरीही माझा मुद्दा असा आहे की मैत्री परस्पर सल्लामसलत करून पुढे नेली पाहिजे.

मात्र काही दिवसांपुर्वीच अब्दू रोजिक हा एमसी स्टॅनबद्दल बोलताना दिसला. अब्दू म्हणाला की, एमसी स्टॅन याच्याबद्दल लोक मला सतत विचारत असतात. एमसी स्टॅनला जेव्हा मी कॉल करतो तेव्हा तो मला सलाम किंवा हाय वगैरे करत नाही. एमसी स्टॅन हा माझा फोन उचलत नाही आणि बरचं काही बोलला.

Archana Gautam Pokes Fun At Abdu Rozik & MC Stan’s Massive  Fight
Amir Khan News: बॉलिवूड पुन्हा टॉलिवूड चित्रपटाचा रिमेक करणार अन् त्यात आमिरचा लाडका लेक चमकणार!

त्यावर अजूनही एम सी स्टॅनची प्रतिक्रिया आलेली नाही त्यामुळे खरचं दोघांमध्ये काही बिनसल आहे असा अंदाज चाहते लावत आहेत. तर अर्चनाबद्दल बोलायचं झालं तर तिचं आणि एम सी स्टॅन याच्यातील वाद तर सर्वांनाच माहित आहे. शो मध्ये असतांनाही दोघांच एकमेंकासोबत बरचं भांडण झालं आहे. त्यानंतर एमसी स्टॅननं त्याला अर्चनाचा चेहराही पहायचा नाही असं म्हणाला होता. त्यामुळे आता यासर्व प्रकरणावर त्याची काय प्रतिक्रिया काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com