"आर्ची'च्या भूमिकेत जान्हवी कपूर?

वृत्तसंस्था
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016

यंदा सुपर - डुपर हिट ठरलेला मराठमोळा चित्रपट "सैराट' आता हिंदीत येणार आहे. बॉलिवूडचा स्टार दिग्दर्शक करण जोहर तो करणार असल्याने त्याविषयी उत्सुकता आहे. नागनाथ मंजुळे यांच्या "सैराट'ने अवघ्या महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात अक्षरशः धुमाकूळ घातला.

"झिंगाट'वर रसिकांबरोबरच अवघी चित्रपटसृष्टी थिरकली. आता आर्चीच्या रूपात जान्हवी कपूरची पावले यावर थिरकणार आहेत. जान्हवी ही श्रीदेवी व बोनी कपूर यांची ज्येष्ठ कन्या आहे. हिंदीतील "सैराट'मध्ये आर्चीच्या भूमिकेसाठी करणने तिची निवड झाली असल्याचे सांगितले जात आहे. ""जान्हवीला चित्रपटात घेण्याविषयी करणने आमच्याशी चर्चा केली असून, आम्ही त्याला परवानगी दिली आहे. मात्र "सैराट'साठी किंवा अन्य कोणत्या चित्रपटासाठी तिची निवड त्याने केली आहे, हे ठावूक नाही,'' असे बोनी कपूरने सांगितले.

Web Title: "Archi'' janhavi Kapoor's role?