अरजित सिंगने केले आपल्या चाहत्यांना नाराज?

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 डिसेंबर 2016

बॉलिवूडमधील सध्या आघाडीवर असलेला गायक अरजित सिंगने पाच वर्षे आपल्या चाहत्यांना सरस गाणी दिली. समस्त तरुणाईला पाच-सहा वर्षे आपल्या गाण्यावर ठेका धरायला लावणाऱ्या अरजितने आपल्या चाहत्यांना नाराज करणारे वक्तव्य केले आहे. एका खासगी वाहिनीच्या कार्यक्रमात अरजित म्हणाला,"" गायनाच्या क्षेत्रात अखेरचे वर्ष असल्याचे सांगितले.''

बॉलिवूडमधील सध्या आघाडीवर असलेला गायक अरजित सिंगने पाच वर्षे आपल्या चाहत्यांना सरस गाणी दिली. समस्त तरुणाईला पाच-सहा वर्षे आपल्या गाण्यावर ठेका धरायला लावणाऱ्या अरजितने आपल्या चाहत्यांना नाराज करणारे वक्तव्य केले आहे. एका खासगी वाहिनीच्या कार्यक्रमात अरजित म्हणाला,"" गायनाच्या क्षेत्रात अखेरचे वर्ष असल्याचे सांगितले.''

एका खासगी वाहिनीवरील "फेम गुरुकुल' या कार्यक्रमातून प्रेक्षकांसमोर आला. त्यानंतर "फिर महोब्बत' आणि मर्डर-2, आशिकी-2,खामोशियॉं,मैं हू तेरा हिरो,दिलवाले,बेफिक्रे, ए दिल मुश्‍किल, तुम बिन-2 या चित्रपटांमधून अरजितला ब्रेक मिळाल्यानंतर दिवाळीला प्रदर्शित झालेला "ए दिल मुश्‍किल' या चित्रपटापर्यंतची गाणी गायली आहेत.

"" बॉलिवूड गायक जास्तीत जास्त सहा-सात वर्षे चाहत्यांना आनंद देऊ शकतो, त्यानंतर फ्रेश आवाज असलेला गायक येऊ शकतो.मला वाटत नाही की,माझ्या आवाजाची जादू आणखी फार दिवस ठेऊ शकेन, हे वर्ष माझ्या गायनाच्या कारकिर्दीतील शेवटचे वर्ष असू शकते,''असे सांगत अरजित आपल्या तरुण चाहत्यांना धक्का दिला आहे.

सूमधूर आवाजाने तरुणाईत लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱ्या अरिजीत सिंगने गायनाच्या कारकिर्द अखेरच्या टप्प्यात असल्याचे सांगत चाहत्यांना धक्का दिला आहे.

दोन वर्षांपूर्वी सलमान खान आणि अरिजीत सिंगमध्ये एका पुरस्कार सोहळ्यामध्ये किरकोळ शाब्दिक चकमक झाली होती. तेव्हापासून दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. सलमान खानच्या किक चित्रपटासाठी अरिजीतने गायलेले गाणे सलमानने चित्रपटातून काढायला लावले होते. त्यानंतर आता त्याच्या सुलतानसाठीही अरिजित सिंगने एक गाणे गायले होते. ते सलमानने चित्रपटातून काढू नये, अशी मागणी अरिजीत सिंगने केली. त्याबद्दल जाहीर माफीही मागितली. मात्र यामुळे सल्लूमियॉंवर त्याचा काहीही फरक पडलेला नाही. त्यामुळे अरिजितनेच सलमान खानच्या कोणत्याही चित्रपटात गाणे न गाण्याचा निर्णय घेतला होता. बॉलिवूडमधला लोकप्रिय गायक अरिजीत सिंग आणि आभिनेता सलमान खान यांच्यातील वाद चित्रपट वर्तुळात चर्चेत आला होता.

 

Web Title: Arijit Singh hints at retiring soon