अरिजीतनं गायलेलं 'कांतारा' चं 'वराह रुपम' ऐकलंत का? त्या कॉन्सर्टचा व्हिडीओ जो पाहतोय तो म्हणतोय..Arijit Singh Varaha Roopam live concert | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arijit Singh Varaha Roopam live concert

Arijit Viral Video:अरिजीतनं गायलेलं 'कांतारा' चं 'वराह रुपम' ऐकलंत का? त्या कॉन्सर्टचा व्हिडीओ जो पाहतोय तो म्हणतोय..

Arijit Viral Video: यावर्षी 'कांतारा' सिनेमानं सगळ्यांवरच आपली जादू केल्याचं आपण पाहिलं. सिनेमा पाहिल्यानंतर क्वचितच असं कुणी भेटलं असेल ज्याच्या अंगावर 'कांतारा' पाहून काटा नं आला असेल. भारतातच नाही तर परदेशातही या सिनेमाला डोक्यावर उचलून धरलं..कौतूकाचा वर्षाव झालेला पहायला मिळाला.

आता गायक अरिजीतसिंगनं काही दिवसांपूर्वी 'वराह रुपम' हे कांतारा सिनेमातलं गाजलेलं गाणं स्टेजवर अशा अंदाजात परफॉर्म केलं की लोक पाहून अवाक झाले. अरिजीतचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

काही नेटकऱ्यांनी ट्वीटरवर व्हिडीओ पाहून अशी देखील प्रतिक्रिया दिली की अरिजीत गाताना असं वाटत आहे की त्याच्यात जणू दैवी शक्तीनं प्रवेश केला आहे. हा कॉन्सर्ट बंगळूरात पार पडला होता.(Arijit Singh Varaha Roopam live concert VIdeo Viral On twitter)

अरजित सिंगचे आपल्यापैकी अनेकजण चाहते असतील. अनेकांनी त्याची गाणी ऐकली असतील. पण नुकत्याच पार पडलेल्या त्या कॉन्सर्टमध्ये त्यानं सादर केलेल्या 'वराह रुपम' गाण्यानं मात्र लोकांवर चांगलीच मोहिनी घातली आहे.

त्याचा परफॉर्मन्स पाहून उपस्थितांच्याच नाही तर तो व्हिडीओ सोशल मीडियावर पाहणाऱ्या प्रत्येकाच्या अंगावर रोमांच उभा राहिला अशी चर्चा जोरदार सुरू आहे. ट्वीटरवर जो तो अरिजीतचा हा व्हिडीओ शेअर करताना दिसतोय.

लोकं त्याचं तोंडभरून कौतूक करताना दिसत आहे. अनेक लोकांनी लिहिलं आहे की,''जणू वाटत आहे की 'वराह रुपम' गाताना त्याच्यात दैवी शक्तीनं प्रवेश केला होता''. तर अरिजीतनं आता साऊथची गाणी देखील गावीत अशी इच्छा देखील काहींनी व्यक्त केली आहे.

ट्वीटरवर एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की, 'मी पूर्ण वेळ स्तब्ध होतो..असं वाटत होतं की त्याच्यात एखाद्या दैवी शक्तीनं प्रवेश केला आहे'. तर आणखी एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की,'अरिजीतनं गाताना भावपूर्ण आपले हात जोडले ते मनाला स्पर्शून गेलं. त्यानं आमचं मन जिंकलं'.

तर एकानं चक्क म्हटलं की,' हे तर अगदी ओरिजनल गाण्यासारखंच गायलं ते देखील लाइव्ह..यासाठी हिम्मत लागते...त्याचे गातानाचे भाव तर सॉल्लिडच होते'.

ट्वीट्सला अनेक लोकांनी 'कांतारा' सिनेमाचा हिरो Rishabh Shetty ला देखील टॅग केलं आहे.