
अनलॉकमध्ये सुट्यांच्या आस्वाद घेण्यासाठी गोव्याला गेलेल्या प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला त्याची ही ट्रीप चांगलीच महागात पडली आहे.
मुंबई- २०२० हे वर्ष सर्वांसाठीच घातक ठरतंय मात्र त्यातही मनोरंजनविश्वासाठी २०२० हे वर्ष खरंच वाईट बातम्या देणारंच ठरतंय. अनलॉकनंतर अनेकजणांनी हळूहळू पुर्वपदावर येण्यासाठी घराबाहेर पडायला सुरुवात केली आहे. सेलिब्रिटींनी तर या न्यू नॉर्मल जीवनशैलीमध्ये काम करायची सवयच लावून घ्यावी असं म्हणतायेत. मात्र याच अनलॉकमध्ये सुट्यांच्या आस्वाद घेण्यासाठी गोव्याला गेलेल्या प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला त्याची ही ट्रीप चांगलीच महागात पडली आहे.
हे ही वाचा: कधीकाळी बेस्ट फ्रेंड्स होत्या सारा अली खान आणि रिया, सुशांतमुळे तुटली मैत्री?
टीव्ही अभिनेता आणि निवेदक अर्जुन बिजलानी या दिवसात गोव्यामध्ये कुटुंबासोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. मात्र यात दरम्यान त्याच्यासोबत एक दुर्घटना घडलीये ज्यामध्ये त्याला गंभीर दुखापत झाली आहे. या दुर्घटनेनंतर डॉक्टरांनी त्याला १ महिना बेडरेस्टवर राहण्याचा सल्ला दिल्याचं कळतंय.
अर्जुनने एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत याबाबतची माहिती दिली आहे. त्याने सांगितलं, सुट्या आता संपल्या आहेत मात्र मी एका दुर्घटनेचा शिकार झालो आहे. माझा पाय मुरगळला आहे ज्यामुळे मी सध्या बेडरेस्ट घेतोय. तो बीचवर गेला होता तिथे त्याला पाच सरकला आणि दोन दगडांमध्ये फसला. पावसामुळे समुद्रकिनारी घसरण तयार झाली होती.
अर्जुन एक-दोन दिवसांतच गोव्यातून मुंबईला परतणार आहे. मात्र आल्यावर तो लगेचच काम करु शकणार नाहीये. अर्जुल त्याच्या कुटुंबासोबत एक मोठ्या सुट्टीवर आहे. सोशल मिडीयावर तो सतत त्याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना अपडेट देत आहे.
arjun bijlani gets injured in goa now in bed rest for six weeks