'मलायका सोबत कशी होती पॅरिस ट्रीप?'; पत्रकाराच्या प्रश्नावर अर्जुनचा पलटवार Arjun Kapoor | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arjun Kapoor speaks on his paris trip question.

'मलायका सोबत कशी होती पॅरिस ट्रीप?'; पत्रकाराच्या प्रश्नावर अर्जुनचा पलटवार

अर्जुन कपूर(Arjun Kapoor) नुकताच गर्लफ्रेंड मलायका अरोरा(Malaika Arora) सोबत पॅरिसला बर्थ डे सेलिब्रेट करुन आला आहे. त्यांच्या रोमॅंटिक हॉलिडेचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. सुट्टी मस्त एन्जॉय करुन परत आलेला अर्जुन कपूर आता आपला आगामी सिनेमा 'एक व्हिलन रिटर्न' च्या प्रमोशनमध्ये गुंतला आहे. या सिनेमाचा ट्रेलर लॉंच सोहळा नुकताच पार पडला. तेव्हा मीडियाच्या काही मजेशीर प्रश्नांना उत्तर देताना अर्जुनने देखील काढता पाय न घेता बिनधास्त उत्तरं दिली आहेत. अर्जुननं गुगली मारत पत्रकारांवर पलटवार केला आहे.(Arjun Kapoor speaks on his paris trip question).

'एक व्हिलन रिटर्न'(Eak Villian Return) च्या ट्रेलर लॉंच कार्यक्रमाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतं आहे,ज्यामध्ये अर्जुन कपूरला प्रश्न विचारला गेलेला दिसतोय की,' पॅरिस ट्रीपचा अनुभव कसा होता?' या पत्रकारांच्या खोचक प्रश्नाचं अर्जुनने त्याच अंदाजात उत्तर दिलं आहे. अर्जुन लगेचच उत्तर देताना म्हणाला आहे की,''तुम्ही मला इन्स्टाग्रामवर फॉलो करता का? तर तिकडे जाऊन चेक करा''. जसं अर्जुननं हे उत्तर दिलं तसं लगेचच कार्यक्रमात हशा पिकला.

हेही वाचा: 'खरं सांगू उद्धवजी,मला लै आनंद झाला'; किरण मानेच्या पोस्टची चर्चा

अर्जुन कपूर यंदा आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी मलायका सोबत पॅरिसला(Paris) गेला होता. यावेळी दोघंही एकत्र बिनधास्त फिरताना दिसत होते. याआधी त्यांना पहिलं एकत्र इतकं बिनधास्त कधीच पाहिलं नव्हतं असंचं जो-तो त्यांचे फोटो पाहून म्हणताना दिसला.

हेही वाचा: घरच्या कुकची माही विजला धमकी; म्हणाला,'200 बिहारी आणून उभे करीन आणि...'

अर्जुन कपूर लवकरच 'एक व्हिलन रिटर्न' सिनेमातून दिसणार आहे. जुलैमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होईल. या सिनेमात त्याच्यासोबत तारा सुतारिया,जॉन अब्राहम,दिशा पटानी देखील दिसणार आहेत. या व्यतिरिक्त अर्जुन 'द लेडी किलर','कुत्ते'आणि 'फन अॅन्ड फ्रस्ट्रेशन' सिनेमातही काम करत आहे. अर्जुन कपूरला 'भूत पुलिस' आणि 'पिंकी फरार' सिनेमातील त्याच्या भूमिकेसाठी चाहत्यांची वाहवा याआधीच मिळाली आहे.

Web Title: Arjun Kapoor Speaks On His Paris Trip With Malaika

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..