अर्जुन - परिणीती पुन्हा एकत्र 

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 जुलै 2017

"इशकजादे' चित्रपटात एकत्र काम केल्यानंतर अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा रुपेरी पडद्यावर पुन्हा एकत्र झळकणार आहेत. हे दोघे दिबाकर बॅनर्जी यांच्या थरारपट "संदीप और पिंकी फरार'मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

यशराज फिल्म्सच्या प्रॉडक्‍शन हाऊसने या चित्रपटाची अधिकृतरित्या ट्विटरवर घोषणा केली आहे. या चित्रपटाबद्दल बॅनर्जी म्हणाले की, या चित्रपटाची कथा अशा मुला व मुलीभोवती फिरते जे एकमेकांसोबत राहू शकत नाहीत; तसेच एकमेकांशिवायही राहू शकत नाहीत. परिणीती म्हणाली, बॅनर्जी यांच्यासोबत काम करण्याची माझी इच्छा पूर्ण झाली. पुन्हा यशराज फिल्म्स स्टुडिओसोबत काम करायला मिळाल्याने खूप छान वाटत आहे, असे अर्जुन म्हणाला. 

Web Title: Arjun - Pariniti work with again