गर्भवती गर्लफ्रेन्डसाठी अर्जून रामपालची शानदार 'बेबी शॉवर' पार्टी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 26 May 2019

अर्जून रामपाल आणि त्याची पत्नी मेहेर जेसिया हे विभक्त झाले आहेत. सध्या अर्जून आणि त्याची गर्लफ्रेन्ड गॅब्रिएला पाली हिलच्या एका अपार्टमेंटमध्ये लिव्ह-इनमध्ये राहत आहेत.

अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची गर्लफ्रेन्ड गॅब्रिएला ही जोडी सध्या चर्चेत आहे. त्याचे कारणही तसेच आहे. गॅब्रिएला सध्या गरोदर आहे आणि अर्जूनने आपल्या लाडक्या गर्लफ्रेन्डसाठी 'बेबी शॉवर' पार्टी तिला सरप्राइज केली होती. यावेळी अर्जून आणि गॅब्रिएलाचे काही जवळचे मित्र-मैत्रिणी पार्टीला हजर होते.

अर्जून रामपाल आणि त्याची पत्नी मेहेर जेसिया हे विभक्त झाले आहेत. सध्या अर्जून आणि त्याची गर्लफ्रेन्ड गॅब्रिएला पाली हिलच्या एका अपार्टमेंटमध्ये लिव्ह-इनमध्ये राहत आहेत. अर्जून आणि गॅब्रिएलाचे लग्न झालेले नाही. या 'बेबी शॉवर' पार्टीत पाहुण्यांचे आतिथ्य करण्यापासून ते डीजे होऊन म्युझिक वाजविण्यापर्यंतची भूमिका अर्जूनने बजावली. 

arjun

अर्जूनला पहिल्या पत्नीपासून माहिका आणि मायरा या दोन मुली आहेत. 20 वर्ष संसार केल्यानंतर मेहेर-अर्जूनचा संसार मोडला. ही 'बेबी शॉवर' पार्टी मेहेरच गॅब्रिएलासाठी होस्ट करणार असल्याच्या चर्चा होत्या, पण अर्जूननेच ही पार्टी होस्ट केली होती. गॅब्रिएला आफ्रीकी मॉडेल आहे. 'सोनाली केबल' या हिंदी चित्रपटातून तिने बॉलिवूड डेब्यू केला होता. 

arjun

arjun

arjun

arjun


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arjun Rampal Throw A Baby Shower Party For Pregnant Girlfriend Gabriella Demetriades