जानेवारीत फुल्ल टू धमाल, मनोरंजनाची पर्वणी ; जबरदस्त 18 वेब सीरिजचा नजराणा

युगंधर ताजणे
Friday, 8 January 2021

 जवळपास 18 नव्या वेबसीरीज या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रदर्शित होत आहेत.

मुंबई - लॉकडाऊनमध्ये वेबसीरिजनं लोकांच्या मनावरील ताण हलका करण्याचे मोठे काम केले. वेगवेगळ्या विषयांवरील मालिकांनी लोकांना रिलॅक्स ठेवले असे म्हणायला हरकत नाही. लॉकडाऊनमध्ये सगळं काही बंद असताना चार भिंतीच्या आत कोंडल्या गेलेल्या लोकांची मानसिकता सकारात्मक ठेवण्याचं कामही या मालिकांनी केलं. 

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातही मोठ्या संख्येनं वेबसीरिज प्रदर्शित होत आहेत. त्या कोणत्या हे आता आपण पाहणार आहोत. विषयांची निवड, त्यातील नाविन्य, नवोदित कलाकारांना मिळालेली संधी, प्रेक्षकवर्ग, अशा विविध बाबी या मालिकांमध्ये लक्षात घेण्यात आल्या आहेत. जवळपास 18 नव्या वेबसीरीज या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रदर्शित होत आहेत.

1.  'American Gods Season 3' -  पहिल्या दोन सीझननंतर या मालिकेचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गुढ, रहस्यमय अशा प्रकारातील मालिकेनं प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. ही मालिका 11 जानेवारीपासून अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे. 

2. 'Cobra Kai: Season 3' - 1984 पासून सुरु असणा-या व्हॅली कराटेच्या टूर्नामेंटचा आता हा तिसरा सीझन प्रदर्शित होतो आहे. त्यात डॅनियल ला रुसो आणि जॉनी लॉरेन्स यांच्यातील संघर्ष आणखी वाढत गेला आहे. ही मालिका 1 जानेवारी पासून नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आली आहे. 

3. 'Gabby's Dollhouse' - सुंदर मांजरी, कलरफुल मॅजिक अशी ओळख असलेल्या गॅबीज डॉल हाऊस अनेकांच्या चर्चेचा विषय आहे. अॅनिमेटेड मालिका म्हणून अशी या सीरीजबद्दल सांगण्यात आले असून ती 5 जानेवारी पासून नेट फ्लिक्सवर रिलीज करण्यात आली आहे. 

4. 'History of Swear Words' - निकोलस केज हिनं ही मालिका होस्ट केली आहे. एका आगळ्या वेगळ्या विषयाची मांडणी या मालिकेत करण्यात आली आहे. त्यात curse words चा इतिहास, त्याची संस्कृती याविषयी भाष्य करण्यात आले आहे. नेटफ्लिक्सवर 5 जानेवारी पासून ही मालिका प्रदर्शित करण्यात आली आहे. 

5. 'Inside the World's Toughest Prisons: Season 5' - जो गुन्हा केला तो अजूनपर्यत कबूल न करता त्याची शिक्षा गेल्या अनेक वर्षांपासून राफेल रो भोगत आहे. आता या मालिकेचा पाचवा सीझन असून 8 जानेवारी पासून रिलिज होणार आहे. 

6.  'Kaagaz' -  सारं काही तोंडी नको त्याला लेखी आधार असावा यामुळे कागदपत्रे सुरु झाली. मात्र ते नसल्यावर एकाला किती दिव्याला सामोरं जावे लागते याचे मार्मिक चित्रण कागज य़ा चित्रपटात दाखविण्यात आले आहे. 7 जानेवारीला हा चित्रपट झी 5 वर प्रदर्शित झाला आहे. 

7. 'Last Man Standing' season nine - माईक बॅक्स्टर हा तीन मुलींचा बाप आहे. त्याच्या आयुष्यात येणा-या वादळांचा शोध, त्याचा प्रवास या मालिकेतून घेण्यात आला आहे. बराच काळापासून चाललेल्या मालिकेचा आता 9 वा सीझन डिझ्ने हॉटस्टारवर 4 जानेवारीपासून प्रदर्शित झाली आहे. 

8. 'Lupin' - काही साहसी घटनांवर आधारित लुपिन ही मालिका आहे. त्यात क्राईम, रहस्य हे सारं आहे. नेटफ्लिक्सवर 8 जानेवारीपासून प्रदर्शित होणार आहे. 

9.  'Maara' - आर माधवनच्या या चित्रपटाची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना होती. चार्ली या सिनेमावरुन हा सिनेमा तयार करण्यात आल्याचे बोलले जात आहे.  8 जानेवारीला हा सिनेमा अॅमेझॉन प्राईमवरुन प्रदर्शित होणार आहे. 

10. 'Marvel Studios: Legends' season one - जगप्रसिध्द माव्हल स्टूडिओनं यापूर्वी एकापेक्षा एक सरस अशा चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यात आता 'Marvel Studios: Legends' season one पुन्हा नव्यानं रंग भरणार आहे. ही मालिका 8 जानेवारा पासून डिस्ने हॉटस्टार वरुन प्रदर्शित होणार आहे. 

11.  'Pieces of a Woman' - नेटफ्लिक्सवर 7 जानेवारीपासून ही मालिका प्रदर्शित झाली आहे. एका वेगळ्या विषयावरच्या या मालिकेचा ट्रेलर सोशल मीडियावर कमालीचा लोकप्रिय झाला होता.

 

  12 . 'Tiger' season one - हा एक माहितीपट आहे. ज्यात प्रसिध्द गोल्फपटू टायगर वुडसच्या व्यक्तिमत्वावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.  ही मालिका गोल्फ खेळात रस घेणा-यांसाठी वेगळी पर्वणी ठरणार आहे. 11 जानेवारी पासून डिस्ने हॉटस्टारवरुन प्रसारित होणार आहे. 
  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Around 18 new titles are streaming and will be streamed on Amazon Prime Video Disney Hotstar Netflix and ZEE5