KRK विरोधात अटक वॉरंट जाहीर, मनोज वाजपेयीबद्दल केलेले 'ते' वक्तव्य पडले महागात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

KRK, manoj bajpayee, KRK arrest warrent

KRK विरोधात अटक वॉरंट जाहीर, मनोज वाजपेयीबद्दल केलेले 'ते' वक्तव्य पडले महागात

KRK Arrest News: इंदूरमधील एका न्यायालयाने कमाल आर खान, ज्याला KRK म्हणूनही ओळखले जाते, त्याच्याविरुद्ध अभिनेते मनोज बाजपेयी यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याप्रकरणी अटक वॉरंट जारी केले आहे.

KRK ने 2021 मध्ये बाजपेयींना त्याच्या ट्विटमध्ये "चरसी, गंजेडी" असे संबोधल्यानंतर हा खटला दाखल करण्यात आला. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 10 मे रोजी होणार आहे.

(Arrest warrant issued against KRK reason over his controversial tweet about Manoj bajpayee)

फ्री प्रेस जर्नलमधील आणि इतर अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, मनोज बाजपेयी यांच्या मानहानीच्या खटल्याच्या उत्तरात इंदूर कोर्टाने KRK विरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे.

इंदूरमधील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांनी गुरुवारी अटक वॉरंट जारी केले आणि पुढील सुनावणी १० मे रोजी ठेवली असणार असल्याची माहिती मनोज वाजपेयीचे वकील परेश जोशी यांनी दिली आहे.

याशिवाय अटक वॉरंट मध्ये नमूद करण्यात आले आहे की, कोर्टाने यापूर्वीही मनोज बाजपेयी प्रकरणात KRK विरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी केले होते कारण तो कोर्टात सुनावणीच्या वेळेस अनुपस्थित राहिला होता.

इतकेच नाही तर मनोजने त्याच्या अर्जात दावा केला आहे की, स्वयंघोषीत समीक्षक असेलला KRK मुद्दाम न्यायालयात सुनावणीच्या वेळेस मुद्दाम अनुपस्थित होता कारण त्याला उगाच सुनावणीला उशीर करायचा आहे.

या सर्व प्रकरणावर KRK च्या वकिलाने असा दावा केला आहे की, मनोज बाजपेयी प्रकरणात KRK ने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याने त्याच्यावरील अटकेची कारवाई थांबली पाहिजे.

काही दिवसांपूर्वीच KRK ने २० मार्च रोजी सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या खटल्याच्या सुनावणीबाबत ट्विट केले होते, त्या ट्विटमध्येही KRK ने बाजपेयींची खिल्ली उडवली होती, त्यांनी लिहिले होते, “मनोज बाजपेयी मुंबईत राहतात पण माझ्या विरुद्ध केस दाखल करण्यासाठी ते इंदूरला गेले.

याचा अर्थ त्याचा मुंबई पोलीस आणि मुंबई न्यायालयांवर विश्वास नाही." आता मनोज वाजपेयींनी मानहानी आणि बदनामीची तक्रार दाखल केल्याने KRK ला अटक होणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे.