'मुन्नाभाई MBBS ३ कधी येणार?' अर्शद वारसी म्हणाला…

दिपाली राणे-म्हात्रे
Sunday, 6 December 2020

'मुन्नाभाई ३' हा सिनेमा येण्याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे मात्र याची शक्यता फार कमी असल्याचं अर्शदने एका वृत्तपत्राला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलंय. 

मुंबई- मुन्नाभाई एमबीबीएस हा सिनेमा सगळ्यांच लक्षात राहिला. खासकरुन संजूबाबांच्या चाहत्यांनामध्ये या सिनेमाची क्रेझ पाहायला मिळाली. या सिनेमाचे पहिले दोन भाग चांगलेच गाजले त्याचबरोबर मुन्नाभाई आणि सर्किटची जोडीही गाजली. आता संजू बाबाच्या चाहत्यांना उत्सुकता आहे की  दुसऱ्या भागानंतर या सिनेमाचा तिसरा भाग येणार का याची.. या सिनेमात सर्किटची भूमिका साकारणाऱ्या अर्शद वारसीनं अखेर यावर प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा: शेतक-यांनी केलेलं 'हे' कृत्य पाहून प्रकाश राज यांनी केलं अन्नदात्यांचं कौतुक​

'मुन्नाभाई ३' हा सिनेमा येण्याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे मात्र याची शक्यता फार कमी असल्याचं अर्शदने एका वृत्तपत्राला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलंय.  सध्या दिग्दर्शक राजकुमार हिरानी हे इतर सिनेमांमध्ये बिझी आहेत. दरम्यान, “असं काहीही होणार नाहीये,” असं अर्शद वारसी मस्करीत म्हणाला. “मला असं वाटतं की तुम्ही विधू विनोद चोप्रा आणि राजकुमार हिरानी यांच्या घरी जायला हवं आणि यावर त्वरित काम करण्यासाठी सांगायला हवं,” असं तो म्हणाला. ब-याच काळापासून राजकुमार हिरानी हे इतर प्रोजेक्ट्समध्ये बिझी आहेत आणि आमच्यासाठी ही दु:खद बाब असल्याचं त्याने म्हटलंय.

'मुन्नाभाई एमबीबीएस' या सिनेमाच्या  दोन्ही भागांमध्ये अर्शद वारसीनं सर्किट ही व्यक्तीरेखा साकारली होती. त्याच्या अभिनयाचं सर्व स्तरातून कौतुक झालं. चाहत्यांमध्ये तर सर्किट चांगलाच प्रसिद्ध झाला. विशेष म्हणजे संजय दत्त आणि अर्शदची जोडीही अनेकांना आवडली. याचं कारण म्हणजे संजय दत्त आणि अर्शद वारसी हे खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. 

Rajkumar Hirani confirms working on 'Munna Bhai 3'

अभिनेता संजय दत्तला कॅन्सरचं निदान झाल्यापासून आमच्यात सातत्यानं चर्चाही होत असते. तसंच त्याची प्रकृती आता उत्तम आहे. काही दिवसापूर्वी संजय दत्त दुबईत असतानाही चर्चा झाली असल्याचंही अर्शदने म्हटलंय.. “मी सतत एक अभिनेता म्हणून विचार करतो की आमचं काम केवळ लोकांचं मनोरंजन करणं हे आहे. जे लोकांना आवडतं तेच मला करायची इच्छा आहे. आपण तेच सिनेमे पाहतो जे आपल्याला आवडतात असंही आपण म्हणू शकतो. यासाठी लोकांना काही पाहायचं असेत तर त्यांच्या पद्धतीनं काम केलं गेलं पाहिजे'' असंही अर्शदने म्हटलंय.

arshad warsi on munna bhai 3 happy to do it but personally want to move on to new things  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: arshad warsi on munna bhai 3 happy to do it but personally want to move on to new things