#HBDSuperstarRajinikanth : माय नेम इज रजनी...'माईंड इट्'!

टीम ई-सकाळ
Saturday, 12 December 2020

त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं त्यांचे चाहते वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करतात. त्यात रक्तदान शिबिरे, अन्न- धान्य वाटप याकडे विशेष लक्ष दिले जाते.​

पुणे : प्रख्यात अभिनेता सुपरस्टार रजनीकांत यांच्या वाढदिवसानिमित्तानं त्यांच्याविषयीच्या काही गंमतीशीर गोष्टीं.  खास चाहत्यांसाठी. रजनीकांत यांचा रोबोट नावाचा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर कॉमेडी मिम्सचा एक नवा प्रकार सोशल मीडियावर सुरु झाला होता. एखाद्या चित्रपटाच्या नावानं इतक्या मोठ्या प्रमाणावर मिम्सचा वापर करणे हे आगळे वेगळे उदाहरण असावे. 

ब्रेकिंग: प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसुजाला हृदयविकाराचा झटका, कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल​

1. चित्रपट क्षेत्रात येण्यापूर्वी रजनीकांत यांनी कुली, सुताराचे आणि बस कंडक्टरचं काम केले आहे. 

Image may contain: 1 person, standing

2. त्यांची पत्नी लता रंगचारी ही त्यांच्यापेक्षा आठ वर्षांनी लहान आहे. लता त्यावेळी एका चित्रपट मासिकासाठी काम करत होती आणि तेव्हा त्यांची ओळख झाली. 

Image may contain: 2 people, people standing

3. आपल्या चित्रपट कारकिर्दीच्या सुरुवातीला रजनीकांत यांना केवळ निगेटिव्ह रोल मिळाले होते त्यांनी बलात्कारी नवरा, व्याभिचारी, सणकी, रागीट स्वरुपाच्या भूमिका केल्या होत्या. 

Image may contain: 1 person, outdoor and close-up

ऐतिहासिक घटनेवर आधारित 'द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव' सिनेमाचं पोस्टर रिलीज​

4.  अमिताभ यांच्या 11 चित्रपटांचा रिमेक रजनीकांत यांनी तमिळ भाषेत तयार केले आहेत. यात दीवार, अमर, अकबर, अँथोनी आणि लावारिस सारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

Image may contain: 6 people

5. कोणेएकेकाळी रजनीकांत यांना एखाद्या चित्रपटासाठी साईन करायचे झाल्यास दिग्दर्शकाला 26 कोटी मोजावे लागत होते. तेव्हा जॅकी चॅननंतर सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते म्हणून त्यांची ओळख होती.

Image may contain: 2 people, people standing and beard

6. त्यांच्या मोठ्या मुलीचा म्हणजे ऐश्वर्याचा विवाह हा अभिनेता धनुषशी झाला आहे. तर लहान बहिणी सौंदर्याचा विवाह उद्योगपती अश्विन रामकुमारशी झाला आहे. 

Image may contain: 4 people, people sitting and close-up

थालापती विजयचा ' मास्टर ' नव्या वर्षात की दिवाळीला?

7. रजनीकांतच्या फॅनफॉलोअर्सची संख्या प्रचंड मोठी आहे. त्यांना व्टिटरवर फॉलो करणा-यांचा आकडा 5.7 मिलियन एवढा आहे. तर त्यांच्या चाहत्यांनी तयार केलेले वेगवेगळ्या अकाऊंट, इंस्टा आणि फेसबूक पेजची संख्याही हजाराच्या घरात आहे. 

Image may contain: 1 person, close-up

8. एक श्रध्दाळू आणि धार्मिक व्यक्तिमत्व म्हणून रजनीकांत यांची ओळख आहे. ते आपल्या आरोग्याकडे फार बारकाईनं लक्ष देतात. त्यासाठी नियमित योगासनेही करतात. त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं त्यांचे चाहते वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करतात. त्यात रक्तदान शिबिरे, अन्न- धान्य वाटप याकडे विशेष लक्ष दिले जाते.

Image may contain: 1 person, close-up

- मनोरंजन विश्वातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article about beloved Thalaivar Superstar Rajinikanth on his 70th Birthday