Anjali Gaikwad
Anjali Gaikwad Team esakal

Indian Idol 12 वाद ; रिअ‍ॅलिटी शो की फसवा - फसवी?

अंजली गायकवाडला (anjali gaikwad) हा शो कमी वोटिंग झाल्यामुळे सोडावा लागला.

सिंगिंग रिअ‍ॅलिटी शो ‘इंडियन आयडॉल 12’ (indian idol 12) सध्या सतत चर्चेचा विषय़ आहे. गेल्या काही दिवसांपासून हा वादाचा एक भाग झाला आहे. कधी पाहुण्या परीक्षकांच्या विधानामुळे, तर कधी ट्रोल झाल्यामुळे. रविवारी रात्रीचा भाग पूर्ण झाल्यानंतर अंजली गायकवाडला (anjali gaikwad) हा शो कमी वोटिंग झाल्यामुळे सोडावा लागला. तिला हा शो सोडावा लागल्यामुळे सोशल मिडियावर याबद्दल नाराजी पसरली आणि आणखी एका नव्या वादाला सुरुवात झाली. (article on indian idol 12 contraversy)

खरं तर प्रेक्षक अनेक दिवसांपासून या शोबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत. या शोमध्ये गुणवत्तेला अजिबात महत्व दिले जात नसल्याची त्यांची भावना आहे. कारण काही स्पर्धक सुरात गात नसतानासुद्धा त्यांना गाण्याची जास्त संधी दिली जाते. ते फक्त एकाच शैलीतील गाणी गात असतात आणि इतर कोणतीही गाणी ती गाऊ शकत नाही. फक्त आणि फक्त किंचाळने एवढाच काय तो प्रकार असतो. काहीं स्पर्धककांच गाणं कमी आणि ओव्हर अॅक्टींग (over acting) जास्त आहे.

अंजली शो मधून बाहेर पडली आणि चर्चा सुरू झाली ती रिअॅलिटी शोमध्ये (reality show) गुणवत्तेला खरंच महत्व दिलं जात? काही दिवसांपूर्वी या शोचा पहिला विजेता अभिजीत सावंत याने म्हटलं होतं की या शोमध्ये कोणीही स्पर्धकांच्या गुणवत्तेविषयी न बोलता कधी कार्यक्रमात एखाद्या स्पर्धकाची गरिबी दाखवली जाते तर कधी दोन स्पर्धकांमधील प्रेम दाखवलं जातं.

कार्यक्रमाचा टीआरपी (Trp) वाढवण्यासाठी कार्यक्रमाच्या निर्मात्यांकडून निरनिराळ्या केवीलवाण्या पद्धती अवलंबल्या जात असल्याचं आपल्या पाहायला मिळत आहेत. इथे स्पर्धकांची घरची आर्थिक परिस्थिती कार्यक्रमाच्या टीआरपीसाठी वापरली जाते किंवा मग स्पर्धकांमध्ये प्रेमाचा ट्विस्ट दाखवला जातो.' याचे उदाहरण म्हणजे सध्या दाखवण्यात येत असलेले पवनदीप राजन आणि अरुणिता कांजीलाल यांच्यामधील प्रेमसंबंध. यात स्पर्धकांच्या अंगी असणाऱ्या गुणांना कायम दुय्यम स्थान दिल्याचे दिसून येते. अंजलीच्या बाबतीत बोलायचं झालं तर गेल्या काही एपिसोडपासून तिला परफॉर्म करण्याची पुरेशी संधी देण्यात आली नाही.

केवळ किंचाळणाऱ्या स्पर्धकांना मात्र एकाच एपिसोडमध्ये दोन-दोनदा गाण्याची संधी दिली गेली. यातील काही स्पर्धकांचे तर चार एपिसोडसाठी विलगीकरण करण्यात आले आले होते. मग त्यांना जजेस आणि जनता यामधून अंजलीपेक्षा जास्त वोटिंग कसे मिळाले? आता या शो च्या माध्यमातून काही प्रश्न निर्माण झाले आहेत. तो म्हणजे गुणवत्तेला काही महत्व नाही. कुणाची किती गरीबी आहे , कुणाचे आईबाप काय करतात, कोणाचे प्रेमसंबंध कितीप्रमाणात दाखवायचे यातच निर्मात्यांना रस आहे.

शोमधील एकही जज स्पर्धकांच्या घडलेल्या चुका सांगत नाही तसेच चुका सुधारण्यास मदत करताना दिसत नाहीत. फक्त कौतुक आणि कौतुक. तसे असेल तर जजची काय गरज आहे? शोमध्ये टीआरपीसाठी फक्त धांगड धिंगाणा आणि भावनिक वातावरण निर्माण करायचे हाच उद्योगधंदा दिसून येतो. शोमध्ये जे काही घडते सर्वकाही स्क्रिप्टवर आधारित असते.

अशाप्रकारच्या भावनिक स्क्रिप्टमुळे स्पर्धकांना प्रसिद्धी मिळते. पण कमी वेळेत लवकरात लवकर यशस्वी होण्याचा हव्यास स्पर्धकांना मोठ्या प्रमाणावर मानसिकदृष्ट्या प्रभावित करतो. काही स्पर्धक खरोखर खूप मेहनत घेतात. जे स्पर्धक या गोष्टींचा भाग न होता आपल्या गाण्यावर फोकस करतात त्यांच्या वाट्याला कायम निराशा आलेली पाहायला मिळते. अंजली याचा बळी ठरली असे म्हणावे लागेल.

Anjali Gaikwad
Indian Idol 12; अंजली गायकवाड स्पर्धेबाहेर, चाहते नाराज
Anjali Gaikwad
देवमाणूस: अटकेनंतर अजितच्या डोक्यात नव्या खेळीची समीकरणं

यासगळ्या परिस्थितीकडे पाहता, यापुढील काळात पालकांनी पाल्याला अशाप्रकारच्या रियॅलिटी शो मध्ये पाठवावे की नाही, याचा विचार त्यांना करावा लागणार आहे. गेल्या काही वर्षांपासून रियॅलिटी शो चा दर्जा ढासळताना दिसत आहे. असं त्या शो च्या माजी स्पर्धकांनीच सांगितलं आहे. त्यामुळे निव्वळ टीआरपीच्या नावाखाली प्रेक्षकांची फसवणूक करणा-या अशा प्रकारचे शो प्रेक्षक पाहणे बंद करण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com