Viral Video : ३५ वर्षांनंतरही अरुण गोविल चाहत्यांसाठी श्री रामच; विमानतळावर महिला झाली नतमस्तक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arun Govil Latest News

Viral Video : ३५ वर्षांनंतरही अरुण गोविल चाहत्यांसाठी श्री रामच; महिला नतमस्तक

Arun Govil Latest News रामानंद सागर यांच्या रामायणात भगवान श्री रामची भूमिका साकारणारे अभिनेता अरुण गोविल (Arun Govil) आजही चाहत्यांसाठी श्री रामच आहे. अरुण गोविल नुकतेच संभाजीनगरच्या रामलीलाला विशेष अतिथी म्हणून पोहोचले होते. अरुण गोविल विमानतळाबाहेर (Airport) येताच चाहत्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. अरुण गोविलच्या चाहत्यांना आजही त्यांच्यामध्ये श्रीरामाची प्रतिमा दिसते.

याचे ताजे उदाहरण विमानतळावर पाहायला मिळाले. विमानतळावरच (Airport) चाहत्याने अरुण गोविल (Arun Govil) यांचे पाय स्पर्श करून स्वागत केले. अरुण गोविल यांच्या स्वागतासाठी महिला भगव्या रंगाची साडी नेसून आली होती. तसेच भगव्या रंगाचा गमछाही आणला होता. जो अरुण यांनी तिला परत दिला.

आयएएस (IAS) सुमिता मिश्रा यांनी याचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये चाहते अरुण गोविल यांचे स्वागत करताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करीत सुमिता मिश्रा यांनी लिहिले की, ‘तुमची प्रतिमा काय आहे आणि इतरांच्या हृदयात तुमची महानता आहे.’

हेही वाचा: Priya Prakash Varrier : प्रिया प्रकाशने परिधान केली बिकिनी; फोटो व्हायरल

सुमिता मिश्रा यांनी ट्विटमध्ये लिहिले की, रामायण टीव्ही सीरियलने ३५ वर्षे पूर्ण केली आहेत. परंतु, रामची भूमिका साकारणारे अरुण गोविल आजही सर्वांसाठी भगवान श्री रामच आहे. भावनिक क्षण. अरुण गोविलने यांनीही इंस्टाग्रामवरून हा व्हिडिओ रिट्विट केला आहे. व्हिडिओमध्ये महिला अरुण गोविल यांना भेटून भावुक होताना दिसत आहे.