
Aai Kuthe Kay Karte: काकण बाशिंग सोडायला अरुंधती-आशुतोष देशमुखांच्या घरी.. अनिरुद्ध बिथरला..
Aai Kuthe Kay Karte: 'आई कुठे काय करते' मालिका आता चांगलीच चर्चेत आहे. मालिकेत नुकताच आशुतोष आणि अरुंधतीचा लग्नसोहळा पार पडल्याने मालिकेचा टीआरपी देखील चांगलाच वाढला आहे.
अरुंधतीने दुसरे लग्न केल्याने मालिकेत मोठा ट्विस्ट आला आहे. विशेष म्हणजे अप्पांनी कन्यादान केल्याने तिचे आधीचे सासरच आता तिचे माहेर झाले आहे. त्यामुळे तिच्या जुन्या सासरी तीचं येणं जाणं असणार आहे. पण या सगळ्यात अनिरुद्धचा मात्र चांगलाच तिळपापड झाला आहे.
आता अरुंधती काकण बाशिंग सोडायला देशमुखांच्या घरी येणार आहे. यावेळी अरुंधतीला पाहून अनिरुद्ध चांगलाच संतापला.
(arundhati and ashutosh come to deshmukh house anirudhha angry reaction Aai Kuthe Kay Karte latest update)
आता अरुंधती आणि आशुतोष यांनी नव्या संसाराची सुरुवात केली आहे. पण लग्नानंतरचा एक विधी असतो तो म्हणजे काकण बाशिंग सोडवायचा.. याच विधीसाठी ते दोघे देशमुखांच्या घरी येणार आहे.
अप्पा सकाळपासूनच अरुंधती आणि आशुतोषची वाट पाहत असतात. कांचन मात्र अरुंधती येणार नाही यावर ठाम असते पण अचानक अरुंधती आणि आशुतोष दारात उभे राहतात आणि अप्पा, कांचन सगळेच खुश होतात.
या भागाचा प्रोमो सध्या व्हायरल होतं आहे. पुढील भागात दिसेल की, अरुंधती आणि आशुतोष काकण बाशिंग सोडायला देशमुखांच्या घरी येतात. त्यावेळी संजना, अनघा सगळेच त्यांचं स्वागत करतात.
त्यावेकी कांचन आशुतोष आणि अरुंधतीला उजव्या हाताने एकमेकांच्या हातातील काकण सोडायला सांगतात. घरातील सगळेच आनंदाने त्यांच्याकडे पाहत असतात. मात्र अनिरुद्ध रागानेच त्यांच्याकडे पाहताना दिसतो. त्याच्या डोळ्यासमोर हे विधी होत असल्याचे त्याचा चांगलाच संताप होतो.
हा प्रोमो सध्या चांगलाच चर्चेत आहे. अरूंधतीला पाहिले लग्न, तीन मुलं आणि सासर सोडून नवा संसार थाटणं सोप्पं नव्हतं. पण नवऱ्याच्या व्यभिचाराला तोंड देण्यासाठी अरुंधती अन्यायाच्या विरुद्ध उभी राहते आणि स्वतःच्या पायावर उभी राहते. तिथे तिला तिचा मित्र आशुतोष भेटतो आणि त्यांच्या प्रेमाला सुरुवात होते. आता ते लग्न बंधनात अडकले असून पुढे काय होईल याची उत्कंठा सर्वांना लागली आहे.