Indian Idol 12: सायलीचं शुभमंगल, अरुणिताच्या शुभेच्छा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arunita gave best wishes to sayali for her wedding

Indian Idol 12: सायलीचं शुभमंगल, अरुणिताच्या शुभेच्छा

इंडियन आयडल नंतर प्रसिद्धी मिळवलेली अरूणिता सध्या 'सुपरस्टार सिंगर-२' ची कॅप्टन म्हणून शो ची शोभा वाढवतेय आणि अरूणीता सायलीच्या लग्नासाठी फार आनंदी आणि उत्सुक दिसतेय.'इंडियन आयडल १२' ची फेम सायली कांबळे लग्नबंधनात अडकणार आहे.आणि अरूणिता सायलीच्या लग्नाला उपस्थित राहाण्यास फारच उत्सुक दिसून येत आहे.दोघीही शो मधे सोबत असल्यामुळे या दोघींमधे बहिणींसारखी जवळीक आहे.

सायली कांबळे तीचा मित्र धवलशी लग्न करतेय.सध्या ती सुपरस्टार सिंगर-२ च्या शुटिंग मधे व्यस्त आहे.(Indian Idol 12)आणि सोबतच तीच्या लग्नाच्या कामांतही गुंतलेली आहे.अरूणिता आणि सायली या दोघी फार चांगल्या मैत्रीणी असून त्या दोघी सोबतसुद्धा राहिल्या आहेत.अरूणिता म्हणाली,मी आणि सायली ताई एका रूम्मेट्स होतो.त्यामुळे ती मला उत्तम समजून घेते.तसेच ती सध्या तीच्या शुटिंग आणि लग्नाच्या गडबडीत गोंधळलेली आहे.तरी मला खात्री आहे की ती सगळं व्यवस्थित पार पाडेल.संगीतातले बारकावे आणि बरंच काही मला सायलीकडून शिकायला मिळाले असेही ती म्हणाली.

हेही वाचा: PHOTO : Indian Idol 12 फेम सायली कांबळेनं बॉयफ्रेंडसोबत केला साखरपुडा

आज सायलीच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा दिवस आहे.आज तीचे धवल सोबत लग्न होणार आहे.सायलीने इंडियन आयडल १२ च्या मंचावर तीच्या दमदार गाण्यांनी जजेसचे लक्ष वेधत टॉप १५ मधे स्थान मिळवले होते.अमूल व्हॉईस ऑफ इंडिया,गौरी के सुपरस्टार,गौरव महाराष्ट्र अशा अनेक शोजमधून सायलीने तीच्या गाण्यातला दमदारपणा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला आहे.अरूणिता आणि सायलीची मैत्रीही सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते.अरूणिताने सायलीला तीच्या लग्नासाठी लग्नानंतरचा प्रवास सुखकर असावा अश्या मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत.

Web Title: Arunita Kanjilal Gave Good Wishes To Sayali Kamble For Her Weddingindian Idol

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top