बॉलीवूड गेलं तेल लावत...सिनेमाच्या ट्रेनिंगसाठी आर्यननं निवडला खास 'या' देशाचा फिल्ममेकरAryan Khan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aryan Khan Debut with webseries, father shahrukh khan hire famous fauda israeli filmmaker to mentor train his son

Aryan Khan: बॉलीवूड गेलं तेल लावत...सिनेमाच्या ट्रेनिंगसाठी आर्यननं निवडला खास 'या' देशाचा फिल्ममेकर

Aryan Khan: मुलगा आर्यन खानला बॉलीवूडमध्ये लॉंच करण्यासाठी शाहरुख खाननं कोणतीच कसर सोडलेली नाही. आर्यनने देखील बहिण सुहाना खानसारखं इंडस्ट्रीत सक्रीय होण्यासाठी कंबर कसली होती. पण आर्यननं वडील आणि बहिणीसारखं अभिनयाची कास न धरता कॅमेऱ्याच्या मागे राहून काम करणं पसंत केलं. आर्यननं अभिनयाऐवजी प्रॉडक्शनमध्ये आपला हात आजमावलाय. गेल्या अनेक दिवसांपासून बातमी होती की शाहरुख खाननं आपल्या मुलाच्या आगामी प्रोजेक्टसाठी एका प्रसिद्ध फिल्ममेकरची निवड केली आहे,जो त्याला ट्रेनिंग देईल.(Aryan Khan Debut with webseries, father shahrukh khan hire famous fauda israeli filmmaker to mentor train his son)

हेही वाचा: Bollywood: कॉस्मेटिक सर्जरीवर हे काय बोलून गेली जॅकलिन?, व्हायरल व्हिडीओ पाहून भडकले लोक...

आर्यन खाननं एक स्क्रिप्ट रायटर म्हणून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं आहे. आज आपलं स्क्रिप्ट पूर्ण झाल्याची पोस्ट त्यानं शेअर केली अन् पुन्हा आर्यन खान सोशल मीडियावर ट्रेन्ड व्हायला लागला. सगळ्यांना आर्यनविषयी इत्तंभूत जाणून घ्यायचं आहे. त्यानं फिल्मविषयी काय शिक्षण घेतलंय,तो कुठे शिकलाय,त्यानं स्क्रिप्ट रायटिंगचं शिक्षण कुठे घेतलं,त्याचा ट्रेनर कोण,त्याची स्क्रिप्ट कशावर आधारित आहे...वगैरे वगैरे..

हेही वाचा- Sextortion: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का?

हेही वाचा: Hemant Dhome:'तेच खुळ्यागत सगळं सुरू आहे ,यातच आलं सग्गळं',लग्नाच्या वाढदिवशी हेमंतची पोस्ट चर्चेत

तसं थोडक्यात इथं पुन्हा सांगतो की शाहरुखच्या रेड चिली बॅनर अंतर्गत बनणाऱ्या वेबसिरीजसाठी आर्यननं स्क्रिप्ट रायटिंग केलं आहे. त्याला दिग्दर्शक म्हणून समोर येण्याआधी लेखक म्हणून काम करायचं होतं. आणि यासाठी शाहरुखनं बॉलीवूडच्या दिग्गजांना दूर ढकलत खास परेदशी फिल्ममेकरची आर्यनचा ट्रेनर म्हणून निवड केली होती. तर शाहरुख खाननं आर्यनचा ट्रेनर म्हणून इस्त्रायली सीरिज 'फौदा' चा फिल्ममेकर लियोर रज याची निवड केली होती.

माहितीसाठी थोडक्यात सांगतो की बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याआधी आर्यनने अमेरिकेतून फिल्ममेकिंगचे ट्रेनिंग घेतले आहे. आर्यनचा पहिल्यापासूनच ओढा फिल्म मेकिंग मध्ये आहे असं अनेकदा शाहरुखनं देखील मुलाखतींमधून सांगितलं आहे. आता सिनेमा पाहिल्यावर कळेलच इस्त्रायली फिल्ममेकरच्या ट्रेनिंगखाली आर्यन खान किती तयार झाला आहे ते.