मादाम तुसाॅं संग्रहालयाची टीम आशा भोसले यांच्या भेटीला

टीम ई सकाळ
मंगळवार, 13 जून 2017

अत्यंत प्रतिष्ठित असा लंडनच्या मादाम तुसाॅं म्युझियममध्ये ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचा पुतळा बसवण्यात येणार आहे. याबाबतच्या बाबींची कायदेशीर पूर्तता करण्यासाठी लंडनहून काही मंडळींचे पथक दिल्लीत आले. 

दिल्ली : अत्यंत प्रतिष्ठित असा लंडनच्या मादाम तुसाॅं म्युझियममध्ये ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचा पुतळा बसवण्यात येणार आहे. याबाबतच्या बाबींची कायदेशीर पूर्तता करण्यासाठी लंडनहून काही मंडळींचे पथक दिल्लीत आले. 

आजवर अमिताभ बच्चन, शाहरूख खान, ऐश्वर्या राय आदी अनेक नामवंत व्यक्तींचा सन्मान तुसाॅं संग्रहालयाने केला आहे. आता त्यात आणखी एक नाव समाविष्ट झाले आहे. आशा भोसले त्याकरीता दिल्ली येषे गेल्या असून पुतळ्यासाठी आवश्यक फोटोसेशन यावेळी करण्यात आले. पुतळ्यासाठी नेमकी कोणती वेशभूषा असावी याबाबतही चर्चा करण्यात आली. आता मुख्य पुतळा बनवण्याचे काम लवकरच सुरू होईल. 

Web Title: asha bhosale london esakal news