... अन्‌ आशा भोसले भावूक झाल्या!

सकाळ न्युज नेटवर्क
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

'जे शेष आहे ते विशेष आहे' अशी आकर्षक टॅगलाईन असलेल्या या चित्रपटाची निर्मिती ओम छगांनी यांची आहे, तर चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक उदापूरकर यांनी केले आहे.

मुंबई : 'प्रवास' या चित्रपटाचा प्रिमियर नुकताच अंधेरी येथील जुहू पीव्हिआर येथे पार पडला. अनेक नामवंत मंडळी या चित्रपटाच्या प्रिमियरला उपस्थित होती.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनीही या चित्रपटाच्या प्रिमियरला विशेष उपस्थिती दर्शवली होती. यावेळी हा चित्रपट पाहताना आशा भोसले यांना अश्रू अनावर झाले आणि त्या भावूक झाल्या.

- राणा दग्गुबतीने शेअर केला 'हाथी मेरे साथी' चा टीजर

यावेळी त्या म्हणाल्या, की 'प्रत्येकाने पाहावा असा हा चित्रपट आहे. अशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरे या दोघांनीही या चित्रपटात अप्रतिम काम केले आहे. हा चित्रपट भावुक करणारा आहे. चित्रपट पाहताना मी खूप रडली. सध्या जे काही जगात चालले आहे ते सगळं या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. चित्रपटाचं संगीत, गाणी, दिग्दर्शन, सिनेमॅटोग्राफी सगळं फार छान आहे.'

- Valentine Special : विराट-अनुष्का लहानपणीच पडले होते प्रेमात, खास व्यक्तीने सांगितलं सिक्रेट !

या चित्रपटातील कलाकारांसोबतच दिग्दर्शक महेश कोठारे, अभिनेते सचिन पिळगावकर, गायक अवधुत गुप्ते, अभिनेता श्रेयस तळपदे, अभिनेत्री निवेदीता सराफ-जोशी, शिवांगी कोल्हापुरे, जूही चावला, श्रद्धा कपूर, गायक सलिम मर्चंट आदी अनेक मान्यवर मंडळींनी या प्रिमियर सोहळ्याला हजेरी लावली.

- 'व्हॅलेटाईन डे'निमित्त रितेश-जेनेलिया घेणार 'या' राजकीय जोडप्याची मुलाखत

'जे शेष आहे ते विशेष आहे' अशी आकर्षक टॅगलाईन असलेल्या या चित्रपटाची निर्मिती ओम छगांनी यांची आहे, तर चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक उदापूरकर यांनी केले आहे.

'प्रवास' चित्रपटाच्या प्रीमिअर शो वेळेची काही क्षणचित्रे: 

Image may contain: 5 people, people standing

Image may contain: 3 people, people standing

Image may contain: 4 people, people standing

Image may contain: 5 people, people standing and indoor

Image may contain: 2 people, people sitting, child and indoor

Image may contain: 10 people, people standing


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Asha Bhosle was goes tearfulness during the premiere show of the film Pravas