
Ashish Vidyarthi : 'मग मी मरू का?' म्हातारा म्हटल्यावर आशिष विद्यार्थींचा संताप!
Ashish Vidyarthi Hits Back At Trolls Who Called Him 'Old' : बॉलीवूडमध्ये खलनायकाच्या भूमिकेतून चाहत्यांची पसंती मिळवणारे कलाकार म्हणून आशिष विद्यार्थी यांचे नाव घेता येईल. त्यांनी काही दिवसांपूर्वीच वयाच्या ५७ व्या वर्षी दुसरे लग्न केले. त्या लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
आशिष विद्यार्थी यांना देखील आपण आपल्या दुसऱ्या लग्नामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात ट्रोल होऊ असे वाटले नव्हते. यासगळ्या परिस्थितीवर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. तुम्ही म्हातारे आहात आणि वयाच्या ५७ व्या वर्षी दुसरे लग्न करता अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यानंतर ज्यांनी विद्यार्थी यांच्यावर टीका केली आहे त्यांनी त्यांना चांगलेच सुनावले आहे.
Also Read - Self Respect चा प्रवास दूराग्रहाकडे नको
दुसऱ्या लग्नानंतर पहिल्यांदाच विद्यार्थी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रसिद्ध डिझायनर रुपाली बरुआ नावाच्या युवतीशी विद्यार्थी यांनी दुसऱ्यांदा संसार सुरु केला आहे. नेटकऱ्यांना मात्र त्यांचे दुसरे लग्न फारसे पटलेले दिसत नाही. म्हणून की काय त्यांनी विद्यार्थी यांच्यावर टीका केली आहे. यानंतर विद्यार्थी यांनी टीका करणाऱ्यांना जराही भाव न देता टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले आहेत.
आशिष विद्यार्थी यांनी टीकाकारांना म्हटले आहे की, मी म्हातारा झालो म्हणून तुम्ही मला सल्ले देणार का, मला तुम्ही म्हातारा का म्हणता हेच मला कळत नाही. मी पुन्हा एका नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. तुम्ही म्हणता तसं मग मी म्हातारा झालो म्हणून मरुन जावं का, असा प्रश्न विद्यार्थी यांनी टीकाकारांना विचारला आहे. काहींनी त्यांना म्हातारा माणूस म्हणून त्यांच्यावर टीका केली होती.

इंडिया टूडेशी बोलताना विद्यार्थी यांनी म्हटले आहे की, एखाद्या माणसाला कुणाची सोबत हवी असेल तर मग त्यानं काय करावं, त्याचा कुणासोबत राहण्याचा निर्णय हा चुकीचा आहे का, तुम्ही त्याच्यावर टीका करुन काय साध्य करता असा प्रश्न विद्यार्थी यांनी टीकाकारांना विचारला आहे.