Shark Tank: मी 'अमूल' मुलगी होईल असं वाटलं नव्हतं!

Shark Tank India
Shark Tank IndiaControversy

नीती सिंघल (Niti Singhal)ला फंड उभा करण्यासाठी 'शार्कस्' (Sharks)समोर तिचा बिझनेस प्रपोजल ठेवण्याची संधी मिळाली. तिच्या कपड्यांचा ब्रँड 'ट्वी इन वन' (Twee In One)ने 'रिव्हर्सिबल', 'सस्टेनेबल' आणि 'कन्व्हर्टेबल' असल्याचे तिने सांगितले. पण ते अशनीर ग्रोव्हरला (Ashneer Grover) प्रभावित करण्यात अपयशी ठरले, ज्यामुळे तिने नीतीला तिच्या फॅशन बद्दल कमेंट करत म्हटले की तीची फॅशन भयानक आहे आणि "तुझी कंपनी बंद करण्याची वेळ आली आहे."

अश्नीर ग्रोव्हरने डिझायनर नीती सिंघल ला नकार दिल्यानंतर, तो इंटरनेटचा आवडता मिम (Meme) मटेरियल बनला आहे. शार्क टँक इंडिया (Shark Tank India) या रिअ‍ॅलिटी शोमध्ये केवळ नेटिझन्सच नाही तर आता अमूल इंडियाने (Amul India) देखील देसी शार्कला त्याच्या बोथट स्वभावासाठी फटकारले आहे. अमूलने आपल्या नवीन डूडलमध्ये अश्नीर आणि त्याची पत्नी माधुरी सोबत दाखवले, जिने कपिल शर्मा शोमध्ये (Kapil Sharma Show) नीती सिंघलचा ड्रेस घातला होता. ते म्हणाले "ये सबको डायजेस्ट होता है." अमूलने या पोस्टला कॅपशन दिले की, "पॉप्युलर इंडीयन बिझनेस रिअॅलीटी टेलीव्हीजन सिरीज, शार्क टँक!''

यावर खूश होऊन नीतीने लिहिले, "धन्यवाद अमूल! मी लहानपणापासूनच तुमचे होर्डिंग्ज बघून प्रेरीत व्हायचे. एक दिवस मी तुमची अमूल मुलगी होईन असे कधीच वाटले नव्हते!!"

सुरूवातीला, फॅशन डिझायनर नीती सिंघल तिच्या कल्पनेवर कठोर टीका करणाऱ्या अश्नीरला प्रभावित करण्यात अपयशी ठरली. 'त्याच्या घरात हे कोणीही नीतीचे कपडे घालणार नाही' म्हणून त्याने तिला दुकान बंद करण्यास सांगितले होते. पण, त्याची पत्नी माधुरी जैन (Madhuri Jain)ने नीतीच्या ब्रँडचा ड्रेस घातला होता. डिझायनरने मग अश्नीर आणि त्याच्या बायकोचा फोटो शेअर केला जिथे तो 'ये सब दोगलापन है' म्हणत लोकांच्या ढोंगीपणाला सांगतो.

Shark Tank India
Thalaivar 169 ची मेगा घोषणा, रजनीकांतच्या स्वॅगने लुटले सर्वांचे लक्ष

माधुरीने कमेंट सेक्शनमध्ये लिहून नीतीचे कौतुक केले, "ड्रेससाठी धन्यवाद. मला वाटते की साईडबोर्डवर प्रेझेंट केलेले कपडे शार्कला आवडले नाहीत, पण तू आणि मॉडेल्सनी परिधान केलेले कपडे चांगले होते. चांगले काम करत राहा आणि तुझ्या उपक्रमासाठी तुला शुभेच्छा."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com