अशोक पत्की, रामदास कामत घेणार नव्या गायक नटांचा शोध

टीम इ सकाळ
सोमवार, 19 जून 2017

मराठी रंगभूमीवरील एक क्‍लासिक नाटकासाठी दोन मातब्बर संस्था एकत्र आल्या आहेत. यातली पहिली संस्था आहे द गोवा हिंदू असोसिएशन आणि दुसरी आहे नाट्यसंपदा कला मंच. संगीतकार अशोक पत्की आणि रामदास कामत हे दोन बुजुर्ग संगीत कलाकारांचा शोध घेणार आहे. 

मुंबई : मराठी रंगभूमीवर संगीत नाटके आली आणि रंगभूमीला सुवर्णकाळ लाभला असे बोलले जाते. संगीत मानापमान, होनाजी बाळा, कट्यार काळजात घुसली, संगीत शारदा, ययाति देवयानी अशी अनेक नाटके आली आणि त्यांना मराठी रसिकाने उचलून धरले. कालांतराने या नाटकांची जागा गद्य नाटकांनी घेतली. आता अपवादाने संगीत नाटके सुरू आहेत. अनेकांना पुन्हा नाटक करायचे आहे, पण गायन आणि अभिनय अशा दोन्ही बाजूंची पुरेशी जाण असणार्या कलाकारांची वानवा असलेली दिसते. पण मराठी रंगभूमीवरील एक क्‍लासिक नाटकासाठी दोन मातब्बर संस्था एकत्र आल्या आहेत. यातली पहिली संस्था आहे द गोवा हिंदू असोसिएशन आणि दुसरी आहे नाट्यसंपदा कला मंच. संगीतकार अशोक पत्की आणि रामदास कामत हे दोन बुजुर्ग संगीत कलाकारांचा शोध घेणार आहे. 

या नाटकाचे नाव अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले असून कलाकारांचा शोध मात्र जोरात सुरू आहे. याबाबत माहिती देताना नाट्यसंपदा कला मंचचे अनंत पणशीकर म्हणाले, आम्हाला या नाटकासाठी 25 ते 30 वयोगटातील कलाकारांची गरज आहे. त्यासाठी आम्ही थेट ऑनलाईन ऑडिशन घेतोय. गायन आणि अभिनय अशी अंगे असणाऱ्या मुलांनी आणि मुलींनी आम्ही सांगितलेली गाणी म्हणून ती रेकॉर्ड करून आमच्याकडे पाठवायची आहेत. प्रख्यात संगीतकार अशोक पत्की आणि रामदास कामत हे या गाण्याचे परीक्षण करतील. त्यानंतर त्यांची निवड होईल. 

या नाटकाचे दिग्दर्शन संपदा जोगळेकर करत असून येत्या तीन महिन्यात हे नाटक रंगमंचावर येईल असा अंदाज आहे. 

१. हे सुरांनो चंद्र व्हा  - ययाती आणि देवयानी
२. सर्वात्मका सर्वेश्वरा - ययाती आणि देवयानी
३. गुंतता ह्रुदय हे - मत्स्यगंधा 
४. या भवनातील गीत पुराणे - कट्यार काळजात घुसली 
५. गर्द सभोंती रानसाजणी - मत्स्यगंधा 
६. सोहम हर डमरु बा़जे - मंदारमाला 

या गीतांपौकी एक गाणे गाऊन ते Audition@goahinduasso.org किंवा natyasampadakalamanch@gmail.com वर ई-मेल करायचे आहे. असेही पणशीकर यांनी सांगितले. 

Web Title: Ashok patki and ramdas kamat came togather esakal news