
Ashok Rane : ज्येष्ठ चित्रपट समीक्षक आणि लेखक अशोक राणे यांना सत्यजित रे स्मृती पुरस्कार
मुंबई : ज्येष्ठ चित्रपट समीक्षक आणि लेखक अशोक राणे यांना चित्रपटसृष्टीतील लेखनासाठी सत्यजित रे स्मृती पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. चित्रपटविषयक उत्तमोत्तम लेखन करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. यापूर्वी हा पुरस्कार अरुणा वासुदेव (२०२१) आणि प्रो. शनमुगदास (२०२२) यांना देण्यात आला होता.
गेली ४६ वर्षे अशोक राणे चित्रपटविषयक लेखन करीत आहेत. जागतिक चित्रपटांवर मराठीमध्ये त्यांनी विपुल लेखन केले आहे. इंग्रजी भाषेतही त्यांनी लेखन केले आहे. चित्रपट समीक्षा लेखनात त्यांनी स्वतःचा आगळावेगळा ठसा उमटविला आहे.
Fipresci-India तर्फे सत्यजित रे मेमोरियल पुरस्कार २०२३ जाहीर करण्यात आला आहे. सत्यजित रे यांच्या आजच्या १०२ व्या जयंतीनिमित्त हा पुरस्कार जाहीर करण्यात येतो. अशोक राणे यांना पहिल्यांदा 1995 साली 'सिनेमाची चित्रकथा' या पुस्तकाच्या लेखनासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
त्यानंतर 2003 साली सर्वोत्कृष्ट सिने-समीक्षक म्हणून आणि 'सिनेमा पाहणारा माणूस' या त्यांच्या आत्मचरित्रात्मक पुस्तकासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तीन वेळा राष्ट्रीय पातळीवर अशोक राणे यांचा गौरव झाला आहे. अशोक राणे यांनी
चित्रपट व आठ माहितीपटांचे दिग्दर्शन केले आहे. विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये FIPRESCI ज्युरीचे सदस्य म्हणून काम केले आहे. राणे यांनी फिल्म सोसायटीच्या चळवळीतही सहभाग घेतला आहे.