
Ashok Saraf Birthday: अशोक मामांना रितेश देशमुखच्या खास शुभेच्छा, एखाद्या ताऱ्याला...
Ashok Saraf Birthday Riteish Deshmukh Share Post: अशोक सराफ यांची चित्रपटसृष्टीतली ओळख म्हणजे ‘अशोक मामा’ खळखळून हसवणारे आणि तेवढेच अंतर्मुख करणारं त्याच व्यक्तीमहत्व आहे. पन्नासच्या वर हिंदी सिनेमे, दोनशेच्या आसपास मराठी सिनेमे, पंधरा टीव्ही मालिका, पंचवीस नाटकं आणि पुरस्काराचं अर्धशतक असे अनेर विक्रम त्याच्या नावे आहेत.
मराठी चित्रपटसृष्टीतील मोठं नाव असलेले अशोक सराफ आज 76 वर्षांचे झाले आहेत. 4 जुन 1947 बेळगाव या गावी अशोक मामांचा जन्म झाला. त्याच्या वाढदिवसानिमित्त मनोरंजन विश्वातुन त्याच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. फिल्म इंडस्ट्रीतुन त्याचा कार्याचा आढावा देत त्याचा सन्मानही केला जात आहे.
आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या आणि आपल्या विनोदाच्या जबरदस्त टायमिंगने प्रेक्षकांना खदखदून हसवणाऱ्या मराठी चित्रपटसृष्टीतील अवलिया म्हणजे अशोक सराफ. आता त्याचा वाढदिवसानिमित्त त्याच्या चाहत्यांनी जल्लोषचं केला आहे.
चाहत्यासोबत कलाकारांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या. अभिनेता रितेश देशमुखनं अशोक मामांना दिलेली शुभेच्छा ही चर्चेत आली. कारण तिनं नेटकऱ्यांच लक्ष वेधुन घेतलं.
अशोक मामा यांच्या वाढदिवसानिमित्त रितेशनं त्याच्यासोबतचा 'वेड' सिनेमावेळी काढलेला फोटो पोस्ट केला. यासोबत त्याने या फोटोवर छान अशा शुभेच्छाही दिल्यात. तो आपल्या पोस्टमध्ये म्हणतो, आतापर्यंतच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... दिग्गज.. अशोक मामा..त्याच्यासोबत अभिनय करण्याची संधी मिळणे हे स्वप्न होते पण त्यांच्यासाठी दिग्दर्शन करणं म्हणजे म्हणजे तारे स्पर्श करण्यासारखे होतं.'

रितेशच्या सुपरहिट ‘वेड’ चित्रपटात अशोक सराफ यांनी त्याच्या वडिलांची भुमिका साकरली होती. अशोक सराफ यांच्यासोबत काम करणं हे रितेशसाठी खूप अभिमानाची बाब असल्याच त्याने आधीच सांगितलं आहे. आता त्याच्याप्रती आदर व्यक्त करत वाढदिवासाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रितेशची ही पोस्ट सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.