Ashok Saraf: अशोक सराफ यांना यंदाचा झी मराठी जीवनगौरव पुरस्कार जाहीर.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ashok Saraf honored with life time achievement jeevangaurav award in zee marathi chitra gaurav purskar

Ashok Saraf: अशोक सराफ यांना यंदाचा झी मराठी जीवनगौरव पुरस्कार जाहीर..

यंदाचा झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा हा खूप अविस्मरणीय होणार आहे कारण अनेक दिग्गज कलाकारांचे धमाकेदार परफॉर्मन्स पाहता येणार आहेत. अजून एक अप्रतिम गोष्ट म्हणजे मराठीतली आपली सदाबहार आवडती जोडी ‘सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर’ बऱ्याच काळानंतर एकत्र धमाकेदार सादरीकरण करणार आहे.

या पुरस्कार सोहळ्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे 'जीवनगौरव पुरस्कार’, ह्यावर्षी या जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी ठरले ते म्हणजे अभिनय सम्राट 'अशोक सराफ'.

(Ashok Saraf honored with life time achievement jeevan gaurav award in zee marathi chitra gaurav purskar )

या महान नटसम्राटाला अभिनेता सिद्धार्थ जाधवने आपल्या नृत्याविष्काराने अशोक मामांचा जीवन प्रवास उलगडत अनोखी मानवंदना दिली.

अशोक सराफ यांची चित्रपटसृष्टीतली ओळख म्हणजे ‘अशोक मामा’! खळखळून हसवणारे आणि तेवढेच अंतर्मुख करणारे अशोक मामा. पन्नासच्या वर हिंदी सिनेमे, दोनशेच्या आसपास मराठी सिनेमे, पंधरा टीव्ही मालिका, पंचवीस नाटकं आणि पुरस्काराचं अर्धशतक.

एवढा प्रचंड प्रवास आहे मामांचा. जो आजही तेवढ्याच ताकदीने चालू आहे. अभिनय शिकायला कुठल्या शाळेत जायची गरज नाही. अशोक सराफ नावाचं विद्यापीठ आहे केवळ बघत राहिलो तरी खूप काही शिकण्यासारखं आहे.

'अशोक मामा, आमच्या आयुष्यातले अनेक क्षण सुंदर केलेत तुम्ही. अशाच आणखी अजरामर भूमिका करण्यासाठी तुम्हाला दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभो हीच प्रार्थना. आणि एवढं प्रचंड यश मिळवूनही तुमच्यासारखं साधं सरळ राहण्याची शक्ती आम्हाला मिळो. तुमच्या अभिनयाला आणि सच्चेपणाला झी मराठी परिवारातर्फे मानाचा मुजरा!' अशा शब्दात झी मराठीने अशोक मामांना मानवंदना दिली आहे.

टॅग्स :ashok saraf