
Ashvini Bhave Birthday: यश पायाशी लोळण घेत असतानाच अमेरिकेने अडवलं, असा आहे अश्विनी भावेंचा प्रवास
Ashvini Bhave Birthday News: अशी ही बनवाबनवी सिनेमा आठवला तर आठवतात धनंजय माने आणि त्यांच्या मॅडम धनंजय मानेंवर ओरडणाऱ्या तरीही मनापासून त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या मॅडम अश्विनी भावे यांनी सुरेख साकारल्या.
आजही अश्विनी भावे यांचं नाव घेतलं की आठवतं त्यांची लिंबू कलरची साडी. आज अश्विनी भावे यांचा वाढदिवस.
करियर सुसाट सुरु असताना अश्विनी भावे यांनी अमेरिकेत जाण्याचा निर्णय का घेतला? आणि त्यावर त्यांच्या यशस्वी करियरवर कसा परिणाम झाला? याचा आढावा घेऊ.
(ashvini bhave successfull career break after she shift america due to marriage)
बॉलीवुडमध्ये यशस्वी पदार्पण
7 मे 1972 रोजी जन्मलेल्या अश्विनी भावेने मराठी सिनेमा तिच्या अभिनयाने गाजवले. पुढे 1991 मध्ये 'हिना' चित्रपटातून बॉलिवूड इंडस्ट्रीत पाऊल ठेवले आणि या चित्रपटात ती ऋषी कपूरसोबत दिसली होती.
या चित्रपटातील अश्विनी भावे आणि ऋषी कपूर यांची केमिस्ट्रीही लोकांना आवडली होती. या चित्रपटातील 'देर ना हो जाए' हे एक गाणेही खूप प्रसिद्ध झाले होते. या चित्रपटाने अश्विनीला खूप प्रसिद्ध झाली, तर प्रेक्षकांना तिचा अभिनय खूप आवडला.
मराठी अन् बॉलीवुडमध्ये करीअर सुसाट
एकीकडे अश्विनी एक से बडकर एक मराठी सिनेमे करत होत्या. तर दुसरीकडे हिंदी सिनेमाही गाजवत होत्या. 1993 मध्ये अश्विनी भावे यांनी 'सैनिक' चित्रपटात मुख्य अभिनेत्रीची भूमिका केली होती.
या चित्रपटात ती अक्षय कुमारसोबत रोमान्स करताना दिसली होती. यानंतर अश्विनीने 1998 मध्ये आलेल्या 'बंधन' चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली.
या चित्रपटात तिने अभिनेता जॅकी श्रॉफच्या पत्नीची भूमिका साकारली होती. तर चित्रपटात ती सलमान खानची मोठी बहीण होती. प्रेक्षकांना ही भाऊ-बहीण जोडी खूप आवडली आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला.
यशस्वी करियरला आड आली अमेरीका...
करियर सुसाट सुरु असताना अश्विनीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. आणि ती लग्न करुन अमेरिकेत गेली.
अश्विनीने चित्रपट जगतात आपले नाणे जमवले होते, याच काळात ती अमेरिकेला गेली आणि तिने सॉफ्टवेअर इंजिनिअर किशोर बोपर्डीकर यांच्याशी लग्न केले.
अश्विनी अमेरीकेला स्थायिक झाली. एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १० वर्ष अश्विनी मनोरंजन विश्वापासुन दूर राहील्या.
पुढे २०१७ ला ध्यानीमनी सिनेमातुन अश्विनीने कमबॅक केलं. याशिवाय 2020 मधील 'द रायकर केस' या वेबसिरीजमध्येही अश्विनी झळकल्या.