आस्ताद आणि स्वप्नालीचं रोमँटिक फोटोशुट, पहा फोटो

वृत्तसंस्था
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

आस्तादची परखड मतं आणि स्पष्टवक्तेपणा हा प्रेक्षकांना आवडला. नुकतच त्याने त्याच्या गर्लफ्रेंडसोबत एकरोमँटिक फोटोशुट केलं आहे. 

मुंबई : बिग बॉसच्या घरातून निघालेल्या स्पर्धाकांना लोकप्रियता मिळते. त्याचसोबत घरातील त्यांच्या वागणूकीमुळे नकारात्मक इमेजही तयार होते. थोडक्यात लोकांच्या मनात स्थान निर्माण करण्यासाठी हा एक चांगला प्लॅटफॉर्म आहे असं म्हणता येईल. हिंदीच्या मागोमाग मराठीमध्येही बिग बॉस आलं आणि त्याला लोकांनी पसंतही केलं. पहिल्या पर्वामधील स्पर्धक हे आजही लोकांच्या मनात घर करुन आहेत. त्यातील एक स्पर्धक म्हणजे आस्ताद काळे. आस्तादची परखड मतं आणि स्पष्टवक्तेपणा हा सर्वांनाच आवडला. नुकतच त्याने त्याच्या गर्लफ्रेंडसोबत एकरोमँटिक फोटोशुट केलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

@patilswapna Pc @sandeepdhumal76 Lala....

A post shared by Aastad Sunita Pramod Kale (@aastadkale) on

गेल्या काही वर्षांपासून आस्ताद मराठी अभिनेत्री स्वप्नाली पाटीलसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. याचा खुलासा त्याने बिग बॉसच्या घरामध्येच केला होता. या दोघांनी त्यांच्या फोटोशुटचे फोटो नुकतेच इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 

सोशल मीडियावरुन त्यांनी नेहमीच प्रेमाचा खुलासा केला आहे. एकमेकांसोबतचे फोटो हे दोघं चाहत्यांसोबत शेअर करत असतात. ‘पुढचं पाउल’ या मालिकेदरम्यान आस्ताद आणि स्पवप्नाली यांची भेट झाली होती आहे तेव्हाच ते प्रेमातही पडले.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Us.... #instagood #instaglam #instagram #couplegoals #photoshoot #marathiactors

A post shared by Aastad Sunita Pramod Kale (@aastadkale) on

आस्ताद याशिवाय ऊन-पाऊस, असंभव, अग्नीहोत्र, वादळवाट, सरस्वती या मालिकांमधून झळकला आहे. साम टिव्हीवर त्याने सुत्रसंचलनही केले आहे. स्वप्नाली आणि आस्तादच्यारोमँटिक फोटोशुटला चाहत्यांनी चांगलंच पसंत केलं आहे. त्यांच्या फोटोंना चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. हे फोटोशुट म्हणजे प्रिवेडिंग शुट असल्याचं बोललं जात आहे. हे दोघं लवकरच लग्नबंधनात अडकणार का याची उत्सुकता चाहत्यांमध्ये पाहायला मिळत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Astad and girlfriend swapnali had a romantic photoshoot