Shah Rukh Khan: अर्रर्रर्र चक चक.. सर्वांसमोर बोलताना शाहरुख चक्क बायकोचं वय विसरला झाली मोठी पंचाईत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Gauri Khan Book Launch,  shah rukh khan, my life in design book

Shah Rukh Khan: अर्रर्रर्र चक चक.. सर्वांसमोर बोलताना शाहरुख चक्क बायकोचं वय विसरला झाली मोठी पंचाईत

Shah Rukh Khan on Gauri Khan Book Launch News: काल १५ मेला शाहरुख खानने त्याची बायको पत्नी गौरी खानचे पहिले पुस्तक, माय लाइफ इन डिझाईन या पुस्तकाचं प्रकाशन केलं.

सोमवारी मुंबईत या पुस्तकाचा दिमाखदार प्रकाशन सोहळा पार पडला. गौरीचे कॉफी टेबल बुक, Ebury Press द्वारे निर्मित, शाहरुख खानच्या हस्ते लाँच झाले.

या खास सोहळ्याला शाहरुखची तिन्ही मुले आर्यन खान, सुहाना खान आणि अबराम खान उपस्थित होते. यावेळी प्रकाशन सोहळ्याला एक खास प्रसंग घडला ज्यामुळे उपस्थित सर्वांना हसू आवरेनासे झाले.

(at the book launch of gauri khan shah rukh khan forgets his wife age video viral)

किंग खानने त्याची पत्नी आणि इंटिरियर डिझायनर गौरी खानच्या पुस्तक लाँच कार्यक्रमात उपस्थिती लावली. कार्यक्रमात बोलताना शाहरुख खान तिचे वय विसरतो.

त्यांनी या पुस्तकाबद्दल सांगितले आणि ते म्हणाले, "या पुस्तकात असे नमूद केले आहे की गौरीने वयाच्या चाळीशीत तिचं स्वप्न साध्य केलंय.

गौरीने केलंय त्याप्रमाणे कोणीही वयाच्या चाळीशीत हे स्वप्न साध्य करू शकते." शाहरुख बोलत असतानाच गौरीने त्याला दुरुस्त केले आणि शाहरुखला सांगितले, "ती आता 37 वर्षांची आहे." हे ऐकताच शाहरुख थोडा थांबला आणि उपस्थित प्रेक्षकांमध्ये हशा पिकला

पुढे जाऊन, शाहरुखने गौरीच्या क्रिएटिव्हिटी बद्दलही सांगितले, गौरीकडे नेहमीच उत्कटता आणि क्रिएटिव्हिटीची भावना असते.

शाहरुख म्हणाला की त्याचे संपूर्ण कुटुंब क्रिएटिव्ह आहे, अगदी त्याचा 10 वर्षांचा मुलगा देखील. अशाप्रकारे शाहरुखच्या उत्स्फूर्त आणि मिश्किल भाषणाने सर्वांची मनं जिंकली. गौरी आणि शाहरुखचा खास अंदाज यावेळी दिसून आला.

शाहरुख खानच्या वर्क फ्रंट बद्दल सांगायचं झालं तर.. अलीकडेच सिद्धार्थ आनंदच्या सुपरहिट 'पठान' सिनेमात शाहरुखदिसला होता.

याशिवाय शाहरुख लवकरच अॅटलीचा आगामी जवान आणि राजकुमार हिरानीच्या डंकीमध्ये देखील दिसणार आहे.

याशिवाय सलमान खानच्या टायगर 3 चित्रपटात सुद्धा शाहरुख पुन्हा एकदा पठाण च्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे.