सुनिल शेट्टीची मुलगी करतेय 'या' भारतीय क्रिकेटपटूला डेट

वृत्तसंस्था
Friday, 28 June 2019

एकीकडे टीम इंडिया वर्ल्डकपमध्ये दमदार कामगिरी करत असताना, के एल राहुल वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. के एल राहुलचं नाव अभिनेता सुनील शेट्टीच्या मुलीशी जोडलं जात असून ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे बोलले जात आहे.

मुंबई : एकीकडे टीम इंडिया वर्ल्डकपमध्ये दमदार कामगिरी करत असताना, के एल राहुल वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. के एल राहुलचं नाव अभिनेता सुनील शेट्टीच्या मुलीशी जोडलं जात असून ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे बोलले जात आहे.
 

Image may contain: 3 people, people smiling, close-up

क्रिकेटर आणि बॉलिवूड अभिनेत्री यांच्या रिलेशनची चर्चा नवी नाही. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत लगीनगाठ बांधली. तर युवराज सिंहनेही हेजल कीचसोबत, झहीर खानने सागरिका घाटगेसोबत विवाह केला. या यादीत आता के एल राहुलचं नाव जोडलं जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Is Athiya Shetty in a relationship with cricketer KL Rahul?