...म्हणून अथिया मोठ्या पडद्यापासून लांब आहे, अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुनिल शेट्टीची मुलगी अथिया तिच्या खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते.
...म्हणून अथिया मोठ्या पडद्यापासून लांब आहे, अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा
esakal

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुनिल शेट्टीची मुलगी अथिया तिच्या खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असतं. अनेकवेळा ती टीम इंडियाचा स्टार खेळाडू केएल राहुलसोबत स्पॉट झाली आहे. पण ती फिल्मी लाइम लाइमपासून ती लांब असल्याने तिच्यावर अनेक सवाल उपस्थित करण्यात येतात. दरम्यान, तिनं तिच्या फिल्मी जगाबद्दल खुलासा केला आहे.

...म्हणून अथिया मोठ्या पडद्यापासून लांब आहे, अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा
विक्रमचा झंझावात! 3 दिवसांत 150 कोटी, 'पृथ्वीराजनं' टाकली मान

अथियाने एका वृत्तसंस्थेशी बोलताना फिल्मी लाइम लाइमपासून लांब असण्यावर खुलासा केला आहे. ती नव्या गोष्टी शिकत आहे. अनेकवेळा कलाकारांना हरण्याची भीती असते, पण माझ्याबाबतीत तसे होत नाही. प्रत्येक माणसाचा प्रवास वेगळा असतो. असे वक्तव्य अथियाने यावेळी केल आहे.

माझ्या मते प्रत्येकाने तेच काम केले पाहिजे ज्याच्यातून त्यांना आनंद मिळतो. बहुतांश लोक केवळ अॅक्टिंगवर आपलं लक्ष केंद्रित करतात. माझ्यासाठी पहिलं प्रेम अभिनय आहे. मात्र, मी अभिनयासोबत एका कंपनीमध्ये काम करत आहे. त्या कंपनीची मी फॅशन डायरेक्टर आहे. मी त्यातून नव्या गोष्टी शिकत आहे. त्यामुळे मी मोठ्या पडद्यापासून लांब असल्याचे अथियाने म्हटलं आहे.

सेटवरची धमालमस्ती, कॅमेरासमोर येण हे प्रत्येक कलाकाल मिस करत असतो. गेल्या काही दिवसांपूर्वी एका चित्रपटाचे शुटिंग केले आहे. मी एकसारखं काम करत आहे. आणि मला जे काम करायचं होत तेच काम मी करत असल्याचे अथियाने म्हटलं आहे.

...म्हणून अथिया मोठ्या पडद्यापासून लांब आहे, अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा
सलमानच्या 'गॅलेक्सी' आपार्टमेंटमध्ये पोहोचले पोलिस,सुरक्षेत अचानक वाढ...

अथिया शेट्टीने सलमान खानच्या 'हीरो' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात त्यांनी आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज पांचोलीच्या विरुद्ध भूमिका साकारली होती. हा सिनेमा निखिल अडवाणीने दिग्दर्शित केला होता. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही.

त्यानंतर अथिया 2017 मध्ये आलेल्या 'मुबारकान' चित्रपटात दिसली होती, ज्यामध्ये तिने अनिल कपूर, अर्जुन कपूर आणि इलियाना डिक्रूजसोबत महत्त्वाची भूमिका साकारली होती.

ती २०१९ मध्ये ‘मोतीचूर चकनाचूर’ या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी सोबत अखेरची दिसली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com