आथियाला करायची ऍक्‍शन

वृत्तसंस्था
गुरुवार, 16 मार्च 2017

ऍक्‍शनसाठी ओळखला जाणारा सुनील शेट्टी याची कन्या आथिया शेट्टी हिने "हिरो' चित्रपटातून दमदार प्रवेश केला; पण या चित्रपटानंतर ती कोणत्याच चित्रपटात दिसली नाही. नुकतीच ती मेबेलीन कंपनीच्या काजळाच्या जाहिरातीत झळकली. त्या जाहिरातीत तिने "बाईकर गर्ल' साकारली आहे. ही जाहिरात करताना फार मजा आली, असे सांगत आथियाने आपल्याला ऍक्‍शन चित्रपट करायला आवडतील, असेही सांगितले. तिचा पहिला चित्रपट "हिरो' हा रोमॅंटिक ऍक्‍शनपट होता; पण यात तिला ऍक्‍शन करण्याची संधी मिळाली नाही. तिचा दुसरा चित्रपट "मुबारका' हाही रोमॅंटिक कॉमेडीपट आहे. त्यात ती अनिल कपूर, अर्जुन कपूर आणि इलियाना डिक्रुजबरोबर झळकणार आहे.

ऍक्‍शनसाठी ओळखला जाणारा सुनील शेट्टी याची कन्या आथिया शेट्टी हिने "हिरो' चित्रपटातून दमदार प्रवेश केला; पण या चित्रपटानंतर ती कोणत्याच चित्रपटात दिसली नाही. नुकतीच ती मेबेलीन कंपनीच्या काजळाच्या जाहिरातीत झळकली. त्या जाहिरातीत तिने "बाईकर गर्ल' साकारली आहे. ही जाहिरात करताना फार मजा आली, असे सांगत आथियाने आपल्याला ऍक्‍शन चित्रपट करायला आवडतील, असेही सांगितले. तिचा पहिला चित्रपट "हिरो' हा रोमॅंटिक ऍक्‍शनपट होता; पण यात तिला ऍक्‍शन करण्याची संधी मिळाली नाही. तिचा दुसरा चित्रपट "मुबारका' हाही रोमॅंटिक कॉमेडीपट आहे. त्यात ती अनिल कपूर, अर्जुन कपूर आणि इलियाना डिक्रुजबरोबर झळकणार आहे. आथियाला स्पोर्टी लूक खूपच आवडतो आणि तिच्या नवीन जाहिरातीतही ती तशाच लूकमध्ये दिसली. त्यामुळे ऍक्‍शन चित्रपट करण्याबद्दल विचारले असता तिच्या चेहऱ्यावर वेगळाच उत्साह ओसंडून वाहू लागला. तिचे वडील सुनील शेट्टी हेही ऍक्‍शनसाठी ओळखले जात असल्याने तीही वडिलांच्या पावलावर पाऊल टाकण्यास उत्सुक असल्याचे दिसून येते. ऍक्‍शन भूमिका करण्याची प्रेरणा तिला वडिलांकडून मिळाली असावी. आथियाची ही इच्छा लवकरच पूर्ण होवो!  

Web Title: athiya shetty wants to action