अभिनेत्री मल्लिका शेरावतवर पॅरिसमध्ये हल्ला

वृत्तसंस्था
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016

पॅरिस - अभिनेत्री मल्लिका शेरावतवर पॅरिस येथे तीन अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याचे धक्कादायक वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे 

पॅरिस - अभिनेत्री मल्लिका शेरावतवर पॅरिस येथे तीन अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याचे धक्कादायक वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे 

मल्लिका पॅरिसमध्ये निवासस्थानी असताना तिच्यावर हल्ला झाला आहे. शनिवारी (दि. 12 नोव्हेंबर) ती आणि तिचा एक फ्रेंच बॉयफ्रेंड पॅरिस येथील निवासस्थानी रात्री साडेनऊच्या दरम्यान दाखल झाले. यावेळी चेहऱ्यावर मास्क लावलेल्या तीन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी एक शब्दही न उच्चारता थेट हल्ला केला. तसेच हल्ल्यानंतर त्यांनी अश्रूधुरही सोडला. त्यानंतर मल्लिका आणि तिच्या मित्राने कसेबसे सुरक्षा यंत्रणांना कळविल्याने हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. विशेष म्हणजे यापूर्वी याच परिसरात असलेल्या अभिनेत्री किम कार्दशियन हिलाही याच परिसरात लुटण्यात आले होते. मल्लिकाचेही घर तिच्या घराच्या जवळच आहे. त्यामुळे या प्रकाराचे गूढ वाढले आहे. तपास यंत्रणा या प्रकरणाचा शोध घेत आहेत.

Web Title: Attack on Mallika Sherawat in Paris

टॅग्स