अतुल कुलकर्णींसह सरपोतदार पडले वेंगुर्लेच्या प्रेमात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 एप्रिल 2019

वेंगुर्ले - बोधी ट्री मल्टिमिडिया प्रा.लि.या कंपनीतर्फे वूट वायकॉम १८ या प्लॅटफॉर्मवर बनत असलेल्या वेब सीरिज चित्रीकरणाच्या निमित्ताने प्रसिद्ध अभिनेते अतुल कुलकर्णी, अश्विनी भावे, मनवा नाईक, ललित प्रभाकर आदी सिने कलाकार वेंगुर्लेत आले होते. या वेळी अतुल कुलकर्णी व वेब सीरिजचे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी वेंगुर्लेतील निसर्गसौंदर्याचे भरभरून कौतुक केले.

चार वर्षांपूर्वी कोकणातील माणसांच्या स्वभाव दर्शनावर आधारित यशस्वी झालेला चित्रपट नारबाचीवाडीच्या दिग्दर्शनानंतर पुन्हा एकदा या वेबसीरिजच्या निमित्ताने सिधुदुर्गात येण्याचा योग आला, असे आदित्य सरपोतदार यांनी सांगितले.

गोव्यात राहात असलेल्या एका काजू उद्योजकाची ही एक कौटुंबिक कहाणी आहे. त्यातील चढउतार व त्यातून त्यांनी केलेला प्रवास या वेबसीरिजमधून उलगडत जाणार आहे. आतापर्यंत बनलेल्या वेबसीरिजमध्ये प्राधान्याने हिदी कलाकारांनी काम केले आहे. परंतु मराठी कलाकारांना घेऊन वूट वायकॉम १८ या कंपनीने प्रथमच याची निर्मिती केली आहे. याचे चित्रीकरण वेंगुर्ले-कॅम्प कॉर्नर येथील प्रसिद्ध अमृता काजू कारखान्यामध्ये झाले असून निर्मिती व्यवस्थापक व लोकेशन मॅनेजर म्हणून बांदा येथील अवधूत महाजन यांनी काम पाहिले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Atul Kulkarni Aditya Sarpotdar loves Vengurle