Autograph movie: टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच घडणार असा प्रयोग! 'ऑटोग्राफ' चित्रपटाची मोठी घोषणा.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Autograph marathi movie release on 14 may on star pravah channel cast ankush chaudhari amruta khanvilkar urmila kothare

Autograph movie: टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच घडणार असा प्रयोग! 'ऑटोग्राफ' चित्रपटाची मोठी घोषणा..

Autograph marathi movie latest update: प्रेमापेक्षा नातं महत्वाचं...कारण प्रेम एकवेळ संपेल पण नातं... ते कायमच असतं.... अशीच एक जपून ठेवावी अशी लव्हस्टोरी म्हणजे ऑटोग्राफ सिनेमा. 

एका व्यक्तीच्या खऱ्या प्रेमाच्या शोधाची आणि त्याच्या या प्रवासात त्याला भेटलेल्या माणसांची ही कथा आहे. सतीश राजवाडे यांचं दिग्दर्शन, अंकुश चौधरी, अमृता खानविलकर, उर्मिला कानेटकर, मानसी मोघे अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमाच्या निमित्ताने एकत्र आलीय.

हा चित्रपट कधी प्रदर्शीत होणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. एक आगळीवेगळी प्रेम कहाणी पाहण्यासाठी सगळेच आतुर होते. आता ती प्रतीक्षा संपली आहे. अखेर हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे आणि त्याचे कारणही तसेच आहे..

(Autograph marathi movie release on 14 may on star pravah channel cast ankush chaudhari amruta khanvilkar urmila kothare)

कारण हा चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला कोणत्याही चित्रपट गृहाची, तिकीटाची आवश्यकता नाही. कारण हा मचअवेटेड सिनेमा थिएटर आणि ओटीटीच्या अगोदर स्टार प्रवाह वाहिनीवर पाहायला मिळेल.

रविवार १४ मेला दुपारी १ वाजता घरबसल्या प्रेक्षकांना या अनोख्या लव्हस्टोरीचा आनंद घेता येईल. टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदा नवाकोरा सिनेमा थिएटर आणि ओटीटीच्या आधी स्टार प्रवाहवर प्रदर्शित होत आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

ऑटोग्राफ सिनेमाचे दिग्दर्शक आणि स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे या सिनेमाविषयी सांगताना म्हणाले, ‘लव्हस्टोरी करायला एक वेगळीच मजा असते. प्रत्येक लव्हस्टोरी आपल्याला कुठेतरी आपलीच आहे असं भासवते आणि म्हणूनच ती प्रत्येकाच्या मनाला भिडते. ऑटोग्राफ सुद्धा अशीच एक लव्हस्टोरी आहे.'

'जगातला प्रत्येक माणूस या अश्या प्रवासातून गेलाय पण याचा शेवट मात्र अनुभवण्यासारखा आहे. दिग्दर्शक म्हणून मला तो फार आवडलाय आणि मला खात्री आहे रसिकांना सुद्धा तो नक्की आवडेल. महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी स्टार प्रवाहवर हा सिनेमा प्रदर्शित होतोय याचा अतिशय आनंद होतोय.’ असे ते म्हणाले.