अवधूत गुप्तेंनी केलं दिल्लीकरांचं अभिनंदन, म्हणाले, 'आम्हाला कुठलाही वाद नकोय'

वृत्तसंस्था
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

मुंबई : दिल्ली विधानसभा निवडणूकीत आम आदमी पक्षाने दणक्यात विजय मिळवला. यानंतर देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी केजरीवाल यांचे अभिनंदन केले. मराठमोळे गायक, संगीतकार अवधूत गुप्तेने यांनीही ट्विट करत केजरीवालांचे अभिनंदन केले आहे. तसेच दिल्लीकरांनी योग्य सरकारची निवड केल्याने त्यांचंही अभिनंदन केलंय.

अरविंद केजरीवाल 'या' दिवशी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

अवधूत आपल्या ट्विटमध्ये म्हणतो की, 'असा ऐतिहासिक निकाल देऊन दिल्लीकरांनी जणु प्रत्येक भारतीयाच्या मनातील संदेश दिलाय की, आम्हाला शाळा, रस्ते आणि महिलांची सुरक्षा हविये.. मंदिरं-मशिदी, पुतळे, कलमं आणि त्यावरुन कुठलाही 'वाद' नकोय!  अभिनंदन दिल्लीकर! अभिनंदन!' अशा शब्दांत अवधूत गुप्ते यांनी दिल्लीकरांना समर्थन दिले आहे. दरम्यान, त्याने हे ट्विट डिलीट केले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

Image may contain: 1 person, text that says "Avadhoot Gupte @AvadhootGupte असा ऐतिहासिक निकाल देऊन दिललीकरांनी जणु प्रत्येक भारतियाच्या मनातील संदेश दिलाय की, आम्हाला शाळा, रस्ते आणि महिलांची सुरक्षा कलमं आणि कुठलाही 'वाद' नकोय! अभिनंदन अभिनंदन #AAP #iloveindians १५२ १०:२४ म.पू. १२ फेब्रु, २०२० ४० लोक याविषयी बोलत आहेत"

केजरीवालांच्या घरी आज 'डबल सेलिब्रेशन'; हे आहे दुसरं खास कारण!

अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाची हॅटट्रीक केली आहे. तिसऱ्यांदा आपचे सरकार येत आहे. आपला ७० पैकी ६२ जागा मिळाल्या तर भाजपने ८ जागांवर विजय मिळवला. तर काँग्रेसला खातंही उघडता आलं नाही. अरविंद केजरीवाल यांचा १६ फेब्रुवारीला मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी होईल.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Avadhoot Gupte congratulate Arvind Kejriwal on victory in Delhi Elections